गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिम..

⚡सावंतवाडी, ता.०२-: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी नगरपरिषद व सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालईवाडा येथे ‘स्वच्छता ही सेवा’ या स्वच्छ भारत मिशनच्या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत विविध उपक्रम नगराध्यक्षा श्रीमती श्रद्धा लखमराजे भोसले, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर आणि आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता दिवस साजरा करत सालईवाडा परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात आली.
यावेळी सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजू भाट नगरपरिषदेचे आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका श्रीमती सुकन्या टोपले, विनोद सावंत मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
