अनादि फाउंडेशन आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सेवाभावी उपक्रम:रुग्णांशी संवाद साधून जाणून घेतल्या समस्या..

⚡कुडाळ ता.०२-: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अनादि फाउंडेशनच्या सह-संस्थापिका तथा काँग्रेस सदस्या प्रिती बांदेकर-शर्मा यांच्या सौजन्याने कुडाळ ग्रामीण रुग्णालय तसेच महिला व बालकल्याण विकास रुग्णालयातील रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांप्रती संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.
यावेळी प्रिती बांदेकर शर्मा यांनी रुग्णालयातील रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्याशी संवाद साधत आरोग्यविषयक अडचणी, समस्या आणि आवश्यक गरजांची माहिती घेतली. रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप करून त्यांच्या लवकर स्वास्थ्यलाभासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, सेवा आणि मानवतेच्या विचारांतून प्रेरणा घेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णसेवेच्या माध्यमातून माणुसकी आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
या उपक्रमाला कुडाळ-मालवण जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, सिंधुदुर्ग बँकेच्या संचालिका विद्या प्रसाद बांदेकर, अल्पसंख्याक कुडाळ तालुकाध्यक्ष तबरेज शेख, युवा तालुकाध्यक्ष मयूर शारबीद्रे, कुडाळ शहराध्यक्ष सुंदर सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष वैभव वेंगुर्लेकर, सेवा दल तालुकाध्यक्ष उल्हास शिरसाट, सुभाष सावंत, वैभव आजगावकर, रोहन काणेकर तसेच अनादि फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य संतोष बांदेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गांधी जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून जनसेवा, सामाजिक बांधिलकी आणि गरजू रुग्णांप्रती सहकार्याची भावना अधोरेखित झाली.
