खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस शिवसेनेच्या वतीने ‘आरोग्य सन्मान दिवस’ म्हणून होणार साजरा

*जिल्हा बँक अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतिश सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.१०-:* रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांचा १५ मार्च हा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने ‘ आरोग्य सन्मान दिवस ‘ म्हणून साजरा केला जाणार आहे. यावेळी कोरोना काळात चांगले काम केलेल्या व्यक्तींना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले जाणार आहे. हा कार्यक्रम पूर्ण जिल्हाभर राबविला जाणार असून प्रातिनिधिक स्वरूपात कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात १५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता खा. राऊत यांच्या हस्ते कणकवली तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांना सन्मानित केले जाणार असल्याची शिवसेना पदाधिकारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत व जि.प. सदस्य गटनेते नागेंद्र परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ओरोस येथील खा. विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी गितेश राऊत, विकास कुडाळकर, जिप सदस्य तथा मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर आदी उपस्थित होते. यावेळी सतीश सावंत म्हणाले की, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे आणि जनतेचे लाडके खा. विनायक राऊत यांचा १५ मार्च रोजी वाढदिवस असून हा दिवस केवळ वाढदिवस म्हणून साजरा न करता हा दीन सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने आरोग्य सन्मान दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. यावेळी कोरोना कालावधीत चांगले काम केलेल्या डॉकटर, नर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, आशा, अंगणवाडी कर्मचारी, पदाधिकारी यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती मोठी असून प्रत्येक तालुका, विभाग स्तरावर सबंधितांचा सन्मान केला जाणार आहे. जिल्हाभर होणाऱ्या कार्यक्रम पैकी कणकवली येथे भगवती मंगल कार्यालय येथे १५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता कणकवली तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत स्वतः उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील वृध्दाश्रमाला जीवनावश्यक वस्तू, रुग्णालयांमध्ये फळांचे वाटप केले जाणार आहे. तसेच जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्या बद्दल खा. राऊत यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार केला जाणार असल्याची माहिती सतीश सावंत यांनी यावेळी दिली. मालवण तालुक्यात आवश्यक ठिकाणी मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने थर्मल गन आणि ऑक्सीमिटर चे वाटप केलं जाणार असल्याचे हरी खोबरेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page