*💫सावंतवाडी दि.१०-:* शहरात पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. मोजेस अँटोनी डिसिल्वा वय ५३, रा. चराठा) असे त्या व्यापाऱ्यांचे नाव असून, चराठे कारीवडे मार्गावरील त्यांच्या बागेतील विहिरीत पडून त्यांच्या मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून,पंचनामा सुरू आहे. गेली अनेक वर्ष ते सावंतवाडी शहरात पोल्ट्री व्यवसाय करत आहेत.
*सावंतवाडी शहरातील पोल्ट्री व्यवसायिकाचा विहिरीत बुडून मृत्यू
