*माजी नगराध्यक्ष कै. लीलाधर हडकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृतीलीला विशेषांकाचे होणार प्रकाशन

*क्रिकेट, बॅडमिंटन आणि हॉलीबॉल स्पर्धेचे देखील करण्यात येणार आयोजन;स्पोर्ट्स असोसिएशन च्या बैठकीत निर्णय

*💫मालवण दि.१०-:* क्रिकेटसह अन्य क्रीडा प्रकारांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेल्या मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक, कर्णधार तथा मालवणचे माजी नगराध्यक्ष कै. लीलाधर हडकर यांच्या प्रथम स्मृतिदिन प्रित्यर्थ मालवण येथे क्रिकेट, बॅडमिंटन आणि हॉलीबॉल या खेळांच्या सामन्यांचे आयोजन तसेच ‘स्मृतिलीला’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्याचा निर्णय मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने हडकर निवासस्थानी आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी नंदू देसाई, पप्पू परब, देवदत्त हडकर,  जगदीश नेवाळकर, बाबा परब, विजय गावकर, उमेश नेरुरकर, परशुराम पाटकर, जॉन नरोन्हा, शंकर पराडकर, निळकंठ मालणकर, रवी तळाशीलकर, बबन रेडकर, जयप्रकाश पराडकर आदी उपस्थित होते.  दि १३, १४ मार्च जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल येथे लहान व मोठ्या गटांमधील बॅडमिंटन सामने, १५, १६ मार्च कन्याशाळा मैदान येथे हॉलीबॉल सामने तर १६, १७ मार्च रोजी मालवण एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डिंग ग्राउंड येथे सावंतवाडी, कुडाळ, देवगड, कणकवली, वेंगुर्ला आणि मालवण या संघांमध्ये लेदर बॉल क्रिकेट सामने होणार आहेत.        १७ मार्च या कै. लीलाधर हडकर यांच्या स्मृतिदिनी ‘स्मृतीलीला’ या विशेषांकाचे बोर्डिंग ग्राउंड येथे प्रकाशन करण्यात येणार आहे.        या कार्यक्रमांना क्रीडाप्रेमींनी कोविड १९ संबंधी नियम, अटी, शर्थीचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page