एसटी बस अडकल्या; शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल, प्रशासनाच्या तत्परतेने मार्ग सुरळीत..
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी नावळे सडुरे महामार्गावर वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीत गांगोचा माळ येथे रस्त्यावर जुनाट आकाशीचे झाड पडल्याने सकाळी या मार्गावरील वाहतूक टप्पे होऊन नावळे सडूरे एसटी बस थांबल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. प्रवाशांनी झाड बाजूला करत एकेरी वाहतूक सुरू केली.
अखेर नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे व तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या आदेशानंतर नगरपंचायती कर्मचाऱ्यांनी झाड तोडून बाजूला केल्यानंतर मार्ग सुरळीत सुरू झाला.
सकाळी 6.45 वा नावळे व सडुरे गावातून येणाऱ्या रात्री वस्तीच्या दोन्ही एसटी बस मार्गावर झाड पडल्याने अडकून पडल्या होत्या यामुळे सकाळी कॉलेजला व शाळकरी विद्यार्थी यांचे मोठे हाल झाले. प्रवाशांनी झाड बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू केल्यानंतर दोन्ही एसटी बस मार्गस्थ झाले.
येणाऱ्य वैभववाडी नावळे सडुरे महामार्गावरील जुनाट आकाश याची झाडे तोडावीत असे प्रवाशांकडून मागणी होत आहे. त्या मागणीचा विचार करून प्रशासनाने ही झाडे तात्काळ तोडून मार्गावरील धोका कमी करावा.

