Headlines

Global Maharashtra Breaking News

वागदेत भरधाव कारची रिक्षा टेम्पोला धडक; चालक जखमी…

⚡कणकवली ता.१५-: मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रेसो कारने रिक्षा टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने वागदे टेंबवाडी येथे अपघात घडला. हा अपघात रविवारी (१५ मार्च) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास झाला. भंगार व्यावसायिक कुमार सूर्यवंशी हे आपल्या ताब्यातील रिक्षा टेम्पो घेऊन कणकवलीहून कसालच्या दिशेने जात होते. त्यावेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या GA-03 Z-9608 क्रमांकाच्या…

Read Full News

वेंगुर्ला पंचायत समिती सभापती – उपसभापती –सदस्य यांचा प्रशासनातर्फे सत्कार….

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य – अधिकारी – कर्मचारी यांची समन्वय बैठक व आढावा सभा पंचायत समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, रेडी पं. स. सदस्य प्रियांका घाटवळ, शिरोडा पं. स. सदस्य योगिता परब, आडेली…

Read Full News

ज्येष्ठ नाट्यकलाकार रतिलाल तारी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान…

अष्टपैलू कलानिकेतन संस्थेतर्फे सन्मान.. ⚡मालवण ता.१४-:अष्टपैलू कलानिकेतन, मालवणतर्फे देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार तारकर्ली येथील ज्येष्ठ नाट्यकलाकार श्री. आप्पाजी उर्फ रतिलाल श्रीधर तारी यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अष्टपैलू कलानिकेतन, मालवणतर्फे नटवर्य कै. राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा तसेच जीवन गौरव पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी मालवण भरड येथील श्री…

Read Full News

क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी ‘स्मृती लीला’ पुरस्कार जाहीर…

रवींद्र तळाशीलकर ; १७ मार्च रोजी गौरव सोहळा… ⚡मालवण,ता.१४-:सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवण स्पोर्ट असोसिएशन आणि हडकर कुटुंबियांच्या वतीने आयोजित तसेच सौ. नंदिता राजेश पाटील पुरस्कृत ‘स्मृती लीला पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रातील अष्टपैलू गुणवंत व्यक्तिमत्त्वांना दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा सोहळा १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता भरड येथील लीलांजली हॉल…

Read Full News

प्रशासन तुमच्या दारात; खांबाळे येथे राजस्व समाधान शिबिर संपन्न…

⚡वैभववाडी ता.१४-: शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी तसेच प्रशासन अधिक पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ राबविण्यात येत आहे. प्रशासन आता तुमच्या दारापर्यंत येत असून या अभियानाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर योजनेअंतर्गत…

Read Full News

देवगड बर्वे लायब्ररीत आज कवी दादा मडकईकर यांचामालवणी कवितांचा जागर…

उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड आणि देवगड पेन्शनर्स असोशिएशन देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने केले आयोजन.. ⚡देवगड ता.१४-:उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड आणि देवगड पेन्शनर्स असोशिएशन देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तसंवाद’ या शिर्षकाखाली संपूर्ण वर्षभरात दर महिन्याला एक याप्रमाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तीनां निमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्याचे एकूण बारा कार्यक्रम नियोजित केले आहेत. आज…

Read Full News

आशिये हद्दीतील नदीतील गाळ काढल्याने पुराची समस्या मार्गी लागेल…

महेश गुरव:दुस-या टप्प्यांतील गाळमुक्त नदी उपक्रमातील कामाचा शुभारंभ ; पावसापूर्वी काम होणार पुर्ण.. ⚡कणकवली ता.१४-: मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात गाळमुक्त नदी उपक्रम राबवण्यात येत आहे. पुरस्थिती निर्माण झाल्यावर नदी फुटुन आशिये गावात खालची गुरववाडी येथील 40 ते 45 घरांना पुराचा वेढा बसत होता. त्यामुळे ही समस्या पालकमंत्री…

Read Full News

एसटी कामगारांच्या मागण्या सोडवून घेण्यासाठी एकजूट दाखवा…

सुभाष देसाई :कुडाळ मध्ये एसटी कामगारसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन ;अधिवेशनात एसटी कामगारांच्या विविध १५ मागण्यांबाबत ठराव.. ⚡कुडाळ ता.१४-: एसटी कामगारांच्या १५ मागण्या सोडवून घेण्यासाठी सर्वांनी एकजूट कायम ठेवून सातत्याने पाठपुरावा करावा. प्रसंगी आंदोलनाची गरज भासल्यास संपूर्ण शिवसेना कामगारांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास शिवसेना नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे…

Read Full News

कुडाळ येथे राष्टीय लोकअदालतीमध्ये १५७ प्रकरणे तडजोडीने निकाली…

⚡कुडाळ ता.१४-: येथील राष्टीय लोक अदालतीत एकूण १५७ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली असून २० लाख ७ हजार २५ रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजीत राष्टीय लोकअदालतीचे उदघाटन कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अघ्यक्ष तथा कुडाळचे दिवाणी न्यायाधीश जी .ए .कुलकर्णी यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यावेळी दिवाणी न्यायालयाचे अतिरीक्त दिवाणी…

Read Full News

मध्यस्थी केंद्रामार्फत कुडाळमध्ये दोन प्रलंबित दावे निकाली…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती, कुडाळ यांचे सहकार्य :मध्यस्थी केंद्राचे पक्षकारांनी मानले आभार.. कुडाळ : “साधु संवाद, मिटवू वाद” न्यायाने उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांचे मार्गदर्शनाने तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय कुडाळ, येथे आयोजित मध्यस्थी केंद्रा मार्फत दोन दावे तडजोडीने निकाली काढण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page