कुडाळ येथे राष्टीय लोकअदालतीमध्ये १५७ प्रकरणे तडजोडीने निकाली…

⚡कुडाळ ता.१४-: येथील राष्टीय लोक अदालतीत एकूण १५७ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली असून २० लाख ७ हजार २५ रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.
कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजीत राष्टीय लोकअदालतीचे उदघाटन कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अघ्यक्ष तथा कुडाळचे दिवाणी न्यायाधीश जी .ए .कुलकर्णी यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यावेळी दिवाणी न्यायालयाचे अतिरीक्त दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. जी. कुभार. तसेच वकील एस बी लोट, वकील एस. जी. मळगांवकर, वकील आर. डी. बिले, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, सहा. सरकारी वकील श्रीमती अमृता मिरजे व श्रीमती स्वाती पाटील तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते
या राष्टीय लोकअदालीतीचे एका पॅनेलमध्ये काम चालले. पॅनल प्रमुख म्हणून जी. ए. कुलकर्णी दिवाणी न्यायाधीश कुडाळ यांनी काम पाहिले. पॅनल सदस्य वकील एस. बी. लोट यांनी काम पाहिले. या राष्टीय लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी स्वरुपात १५४ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी ३९ प्रकरणे निकाली झाली. तसेच वादपूर्व १०२१ प्रकरणांपैकी ११८ प्रकरणे निकाली झाली. एकूण ११७५ प्रकरणांपैकी १५७ प्रकरणे निकाली निघून २०,०७,०२५/-एवढया रक्कमेची वसूली करण्यात आली. तसेच या राष्टीय लोकअदालीचे विशेष म्हणजे ३० वर्ष जुने दिवाणी एक प्रकरण तडजोडीने निकाली झाले.
राष्टीय लोकअदालीत यशस्वी करणेसाठी बॅक आफ इंडीया, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट , बॅक ऑफ बडोदा, युनियन बॅंक , महाराष्ट ग्रामीण बॅंक, कॅनरा बॅंक, सेंटल बॅंक, युको बॅंकचे शाखाधिकारी तसेच विज वितरण कंपनी यांचे लेखापाल, ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत परबवाडा पाट, गाेवेरी, माणगांव, पुळास, तेंडोली, मुळदे, तेर्सेबांबर्डे, केरवडे,घावनळे ऊपस्थित होते.
राष्टीय लोकअदालतीचे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी न्यायालयाचे सहायक अधिक्षक एस. डब्लू .पई तसेच न्यायालयाचे कर्मचारी एल.डी.सावंत, लघुलेखक आर.टी.आरेकर, वरीष्ठ लिपीक, एम.बी.भाटकर, वरीष्ठ लिपीक तसेच कनिष्ठ लिपीक श्रीमती एस. के.म्हाडगूत, श्रीमती जे.व्ही. तोंडवळकर, डी.आर.घाडीगांवकर आणि चपराशी श्री.करंगुटकर,श्री.चव्हाण यांनी परीश्रम घेतले.

You cannot copy content of this page