जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती, कुडाळ यांचे सहकार्य :मध्यस्थी केंद्राचे पक्षकारांनी मानले आभार..
कुडाळ : “साधु संवाद, मिटवू वाद” न्यायाने उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांचे मार्गदर्शनाने तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय कुडाळ, येथे आयोजित मध्यस्थी केंद्रा मार्फत दोन दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले. कुडाळ या न्यायालयात गेली ८ व १० वर्षे हे दवे प्रलंबित होते.
उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांचे मार्गदर्शनाने तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय कुडाळ, येथे आयोजित मध्यस्थी केंद्रा मार्फत सामान्य गोरगरीब पक्षकारांच्या हिताच्या दृष्टीकोनातुन पैसा, वेळ, मानसीक स्वास्त यांचा विचार करता कोर्टामध्ये दाखल होणा-या केसीस तडजोडीने लवकरात लवकर निकाली होण्याच्या दृष्टीकोनातुन दिवाणी न्यायालय, कुडाळ येथील मध्यस्थी केंद्र मोठया प्रमाणात सहायक ठरत आहे. यासाठी अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कुडाळ, तसेच या न्यायालयातील जेष्ठ प्रशिक्षीत मध्यस्थी वकील राजीव बिले, नारायण वैदय, सुहास सावंत, श्रीम. निलांगी रांगणेकर, श्रीम. राजश्री नाईक, महेश कुंटे, अमोल सामंत, श्रीम. गौरी देसाई, विवेक मांडकुलकर, डी.एस.सामंत, के.एन.डांगी, एस.बी.लोट, एस.के.तायशेटे, जे.एस.सामंत, एस.व्ही.प्रभू, एस.जी.मळगांवकर यांचेही मोठया प्रमाणात सहकार्य व योगदान दिसून येत आहे.
या न्यायालयात गेली ८ व १० वर्षे प्रलंबित असलेले दोन दिवाणी कडील दाव्यांचा विचार करता सदरचे दोन्ही दावे समजुतीने निकाली करता येतील असे वाटत असल्याने मा. दिवाणी न्यायाधीश, कुडाळ यांनी मध्यस्थी केंद्रकडे वर्ग करून जेष्ठ प्रशिक्षीत मध्यस्थी वकील यांची नियुक्ती केली. जेष्ठ प्रशिक्षीत मध्यस्थी वकील यांनी दोन्ही बाजुच्या पक्षकारांच्या हीताचा व हक्काचा सर्वोतोपरी विचार करून त्यांच्याशी वारंवार बैठका घेवून त्यांच्या वेळेचा, पैशाचा व मानसिक त्रास दुर करणेच्या दृष्टीने व सलोख्याने एकत्रित रहाण्यासाठी प्रयत्न केेले. हा प्रयत्न दि. १०/०३/२०२६ रोजी यशस्वी झाला. या दोन्ही दाव्यांमध्ये ८० वर्षापेक्षा जास्त वयाचे एक पक्षकार गेली ८ व १० वर्षे या दाव्यांच्या निकालाचे प्रतिक्षेत होते. तडजोडीने हे दावे निकाली होणार असल्याने आपल्या आजारपणाचा विचार न करता व्हीलचेअरवर बसून हे पक्षकार या न्यायालयात दाखल झाले व दाव्यांमध्ये तडजोडीने निकाली करण्यासाठी सहकार्य केले. या जेष्ठ व्यक्ती यांनी तसेच वादी व प्रतिवादी यांनी व त्यांचे वकीलांनी आभार मानले.
तसेच या न्यायालयाकडे गेली ९ वर्षे प्रलंबित असलेला दिवाणी कडील दावा दि. १२/०३/२०२६ रोजी मध्यस्थीसाठी प्रशिक्षीत मध्यस्थी यांचेकडे वर्ग करणेत आला. प्रशिक्षीत मध्यस्थी यांनी वादी व प्रतिवादी यांना मध्यस्थी केंद्राकडील फायदे समजावून सांगुन केस तडजोडीने कशी मिटविता येईल याचे मार्गदर्शन केल्याने व तसे दोन्ही पक्षकारांना पटल्याने सदरचा दावा तडजोडीने निकाली करणेत आला. या दाव्यातील वादी यांचे हृृदयाचे ऑपरेशन होवूनही ते याकामी हजर होते. दाव्यात तडजोड होवून दावा निकाली निघाल्याने त्यांच्या चेह-यावरील आनंद द्वीगुणीत झाल्याने त्यांनी तसेच प्रतिवादी यांनी व त्यांचे वकीलांनी प्रशिक्षीत मध्यस्थी व कर्मचा-यांचे आभार मानले.
हे दावे तडजोडीने निकाली करणेसाठी वरिष्ठ लिपीक एम. बी. भाटकर, वरिष्ठ लिपीक के. टी. कदम, कनिष्ठ लिपीक सौ. ए. पी. कदम, यांनी कामकाज पाहीले. मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांचे मार्गदर्शनाने तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय कुडाळ, येथे प्रलंबित दिवाणी किंवा फौजदारी कडील प्रकरणे मध्यस्थी केंद्रा मार्फत लवकरात लवकर तडजोडीने निकाली करून आपसातील हेवेदावे, मानसिक त्रास दुर करणेच्या तसेच वेळ व पैसा वाचण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन दिवाणी न्यायाधीश, कुडाळ यांनी सर्वांना केलेले आहे.
