⚡बांदा ता.१४-: रंगपंचमीमुळे सोमवारी बहुतांश दुकाने बंद राहणार असल्याने बांद्याचा आठवडा बाजार यावेळी रविवार दिनांक १५ मार्च रोजी भरविण्यात येणार आहे. ग्राहकांनी याची नोंद घेऊन गैरसोय टाळावी असे आवाहन बांदा व्यापारी संघ व बांदा ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
बांदा येथे दर सोमवारी भरणारा पारंपरिक आठवडा बाजार हा परिसरातील नागरिकांसाठी खरेदीचे महत्त्वाचे केंद्र मानला जातो. मात्र यंदा सोमवार दिनांक १६ मार्च रोजी शिमगोत्सवनिमित्त रंगपंचमी साजरी होणार असल्याने शहरातील बहुतांश दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी संघ आणि ग्रामपंचायत प्रशासनाने एकत्रित निर्णय घेत आठवडा बाजार एक दिवस आधी म्हणजेच रविवार दिनांक १५ मार्च रोजी भरविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
बांदा दशक्रोशीतील तसेच गोवा राज्यातूनही अनेक ग्राहक आठवडा बाजारासाठी बांद्यात येत असतात. त्यामुळे ग्राहकांनी बाजाराच्या बदललेल्या दिवसाची नोंद घेऊन रविवारीच खरेदीसाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रंगपंचमीमुळे बांद्याचा आठवडा बाजार रविवारी…
