वेंगुर्ला पंचायत समिती सभापती – उपसभापती –सदस्य यांचा प्रशासनातर्फे सत्कार….

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य – अधिकारी – कर्मचारी यांची समन्वय बैठक व आढावा सभा पंचायत समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, रेडी पं. स. सदस्य प्रियांका घाटवळ, शिरोडा पं. स. सदस्य योगिता परब, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर, वायंगणी पं. स. सदस्य शीतल राऊत, उभादांडा पं. स. सदस्य साक्षी नार्वेकर, म्हापण पं. स. सदस्य आप्पी फणसेकर, आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी, तुळस पं. स. सदस्य सुचिता वजराटकर इत्यादीचा प्रशासनातर्फे तसेच गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांचाही सभापती शंकर घारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र लिलके, उपअभियंता सुहास टेमकर, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कावले, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, सहाय्यक लेखाधिकारी वीरेंद्र मोरे, तसेच इतर विभागाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पं. स. अधिकारी व कर्मचारी यांनी चांगल्या पद्धतीने – समन्वयाने काम करावे, असे आवाहन सभापती शंकर घारे यांनी केले.

You cannot copy content of this page