देवगड बर्वे लायब्ररीत आज कवी दादा मडकईकर यांचामालवणी कवितांचा जागर…

उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड आणि देवगड पेन्शनर्स असोशिएशन देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने केले आयोजन..

⚡देवगड ता.१४-:
उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड आणि देवगड पेन्शनर्स असोशिएशन देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तसंवाद’ या शिर्षकाखाली संपूर्ण वर्षभरात दर महिन्याला एक याप्रमाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तीनां निमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्याचे एकूण बारा कार्यक्रम नियोजित केले आहेत. आज रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी सायं. ५ वा. या कार्यक्रम श्रृंखलेचे पहिले पुष्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध मालवणी कवी श्री दादा मडकईकर हे आपल्या बहारदार मालवणी कविता आणि गायनाच्या सादरीकरणांतून गुंफणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन पडेल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि कलाप्रेमी श्री दिलीपकुमार फडके यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रम बर्वे लायब्ररी शेजारील स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात होणार आहे.
तरी या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बर्वे लायब्ररीचे अध्यक्ष डॉ. गुरूदेव परूळेकर आणि देवगड पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजेंद्र हिंदळेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page