Headlines

शहरातील विकासकामांचा शुभारंभ

नगरसेवक देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर यांचा पाठपुरावा

सावंतवाडी : नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आखण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण विकासकामांचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी उत्साहात संपन्न झाला.आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार आणि स्थानिक नगरसेवकांच्या विशेष पाठपुराव्यातून ही विकासकामे मार्गी लागली आहेत.

स्थानिक नगरसेवक देव्या सुर्याजी आणि शर्वरी धारगळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या सर्व विकासकामांना मंजुरी मिळाली असून या कामांची भूमिपूजन संपन्न झाली.‌ यात मच्छीमार्केट येथील अशोक देसाई यांच्या दुकानापासून ते जावेद शेख यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार उभारणी, कशाळीकर दवाखाना ते फिश मार्केटपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटार बांधणे व ते बंदिस्त करणे, चेतन नेवगी घर ते क्राऊन बेकरी, मच्छी मार्केट दरम्यान आर.सी.सी. गटार बांधणे, होळीचा खुंट ते राजा स्वार घर गटारकाम, म्हाडेश्वर घर ते पै गिरण रस्ता डांबरीकरण व गटार बांधून बंदिस्त करणे, कळसुलकर शाळेमागील शिरवलकर घर ते बिले घर नाला बंदिस्त करणे आदी कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला
याप्रसंगी नगरसेवक देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, नगरसेवक प्रतीक बांदेकर,राजन महाडेश्वर,चेतन नेवगी,तुषार वेंगुर्लेकर,भारत निंबाळकर,हेमंत मुंज,अमजद राजगुरू,आकाश सावंत,अमिर खान,अमोल मुंज,समिर खान,जावेद खान,शशी देऊलकर,प्रसाद देऊलकर, सचिन तावडे,नागेश नेवगी, वसंत पडते,ओंकार सावंत,मेहर पडते,निखिल पाटील,राजेश दाभोलकर,अक्षय शिरवलकर,पियुष राठोड,दयानंद वेंगुर्लेकर राजू केळुसकर,मंदार सावंत,सौ.बिले,सौ.मडगावकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page