Headlines

Global Maharashtra Breaking News

आमडोस माजी सरपंच दिगंबर नके यांचे निधन

चौके पंचक्रोशित हळहळ *💫मालवण दि.१८-:* मालवण तालुक्यातील आमडोस गावचे माजी सरपंच दिगंबर लक्ष्मण नके यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. नके यांच्या निधनाने आमडोस गावचे मोठे नुकसान झाले असून चौके पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दिगंबर नके हे आमडोस गावचे सलग २० वर्षे उपसरपंच होते. मागील कार्यकारिणीमध्ये त्यांनी प्रभारी सरपंच म्हणून काम पाहिले होते….

Read Full News

देवगड बोट दुर्घटनेतील आणखी एका खलाश्याचा मृतदेह सापडला

दोन खलाशी अजुनही बेपत्ता *💫देवगड दि.१८-:* देवगड येथे बोट फुटून समुद्रात बुडल्याने झालेल्या दुर्घटनेत चार खलाशी बेपत्ता झाले होते. यातील एका खलाश्याचा मृतदेह काल सापडला होता. तर आज आणखी एका खलाश्याचा मृतदेह सापडला असून, नंदकुमार नार्वेकर असे त्याचे नाव आहे. तर अजूनही दोन खलाशी बेपत्ता आहेत.

Read Full News

चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त व्यापारी आणि पर्यटन व्यवसायिकांनी तातडीने भरीव नुकसान भरपाई द्या

जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी *💫मालवण दि.१८-:* तोत्के वादळामुळे जिल्ह्यातील व्यापारी व पर्यटन व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना आर्थिक नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कोरोना व्हायरस मुळे मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्ग आधीच आर्थिक…

Read Full News

तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदतकार्य सुरू करावे…

खासदार सुरेश प्रभू यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी_ *💫सिंधुदुर्ग दि.१७ प्रसन्न गोंदावळे-:* तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात कोकणाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हानी पोचलेल्या लोकांना मदतकार्य सुरू करावे तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून त्यांच्यासाठी साहित्य व मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून…

Read Full News

पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा…_

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आवाहन_ *💫मालवण दि.१७-:* तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा मालवण शहराला बसला असून किनारपट्टी वरील घरे, अन्य इमारती, शहरातील माड, आंबा इ. झाडे आदींची मोठी हानी झाली असून मालवण शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने धामापूर पाणी पुरवठा प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित असल्याने मालवण शहराला पाणीपुरवठा करणे सद्यस्थितीत शक्य होणार नाही. वीजपुरवठा…

Read Full News

तौक्ते वादळासह आलेल्या उधाणाचा आचरा गावाला फटका…

*💫मालवण दि.१७-:* तौक्ते वादळासह आलेल्या उधाणाचा फटका आचरा गावाला जोरदार बसला आहे. पाणी वस्तीत शिरून काहींच्या घराच्या भिंती कोसळल्यात तर काहींच्या घरावर झाडे पडून डोक्यावरचे छप्परच गायब झाले आहे. कुणाचे पावसाळी बेगमी साठी साठवलेले धान्य ,भांडीकुंडी भिजून वाहून गेल्याने नुकसान झाले. यातच तौत्केचा फटका विद्यूत मंडळाला बसल्याने रविवार सकाळपासूनच विद्यूत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे…

Read Full News

तौक्ते चक्रीवादळाचा चौके गावाला तडाखा…

अनेक घरांची पडझड तर ठिकठिकाणी झाडे पडली उन्मळून_ *💫मालवण दि.१७-:* तौक्ते चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार माजविला असून या चक्रीवादळने चौके गावाला जबरदस्त तडाखा दिला आहे. चौके गावातील अनेक घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून तर काही ठिकाणी मोडून पडली आहेत चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे छप्पराचे पत्रे उडून गेले आहेत रविवारी पहाटे पासून सोसाट्याचा वारा…

Read Full News

तौक्ते चक्रिवादळात आपदग्रस्त झालेल्या जनतेला शासकीय निकष बाजूला ठेवून शासनाने मदत करावी…

राष्ट्रवादीचे अमित सामंत व काका कुडाळकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी_ *💫कुडाळ दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल झालेल्या तौक्ते चक्रिवादळात आपदग्रस्त झालेल्या जनतेला शासकीय निकष बाजूला ठेवून शासनाने मदत करावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील व जिल्हा संपर्कमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांनी केली आहे….

Read Full News

तौक्ते चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेली विद्युत यंत्रणा तात्काळ पूर्ववत करावी…_

खासदार विनायक राऊत यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागणी_ *💫सिंधुदुर्ग दि.१७ प्रसन्न गोंदावळे-:* तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांतील उद्ध्वस्त झालेली विद्युत यंत्रणा तात्काळ पूर्ववत करावी, अशी मागणी सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. तौक्ते चक्रीवादळामुळे हजारो विजेचे पोल उन्मळून पडले आहेत. अनेक वीजवाहिन्या…

Read Full News

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे नुकसानीचे प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करावेत…

मनसेचे तहसीलदारांना निवेदन;नुकसान भरपाईचे निकष बदलून जनतेला भरघोस मदत करा-: अमित इब्रामपूरकर *💫मालवण दि.१७-:* ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे नुकसानीचे प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करावेत तसेच नुकसान भरपाईचे निकष बदलून जनतेला भरघोस मदत करावी अशी मागणी तालुका मनसेच्या वतीने मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार अजय पाटणे यांच्याकडे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मालवण…

Read Full News

You cannot copy content of this page