पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा…_

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आवाहन_

*💫मालवण दि.१७-:* तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा मालवण शहराला बसला असून किनारपट्टी वरील घरे, अन्य इमारती, शहरातील माड, आंबा इ. झाडे आदींची मोठी हानी झाली असून मालवण शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने धामापूर पाणी पुरवठा प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित असल्याने मालवण शहराला पाणीपुरवठा करणे सद्यस्थितीत शक्य होणार नाही. वीजपुरवठा सुरु झाल्यावर शहरात पाणीपुरवठा पूर्ववत सुरु केला जाणार असल्याने आपती काळात नागरिकांनी पाण्याचा वापर कमी आणि जपून करावा. व पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मालवणचेनगराध्यक्ष श्री. महेश कांदळगावकर आणि मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे तौक्ते चक्रीवादळामुळे शहरात बऱ्याच ठिकाणी झाडे पडून शहरातील सुमारे ३० ते ३५ छोटे-मोठे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. ही पडलेली झाडे तोडून सर्व रस्ते मोकळे करण्याचे काम नगरपरिषदेमार्फत वेगवेगळ्या टीम बनवून युद्धपातळीवर सुरु असून आतापर्यंत १५-२० रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले आहेत. झाडे तोडून रस्ते मोकळे करण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन मुख्य अधिकारी व नगराध्यक्ष यांनी केले आहे.

You cannot copy content of this page