तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदतकार्य सुरू करावे…

खासदार सुरेश प्रभू यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी_

*💫सिंधुदुर्ग दि.१७ प्रसन्न गोंदावळे-:* तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात कोकणाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हानी पोचलेल्या लोकांना मदतकार्य सुरू करावे तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून त्यांच्यासाठी साहित्य व मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी खासदार सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

You cannot copy content of this page