जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
*💫मालवण दि.१८-:* तोत्के वादळामुळे जिल्ह्यातील व्यापारी व पर्यटन व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना आर्थिक नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कोरोना व्हायरस मुळे मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्ग आधीच आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला असल्याचे मत देखील त्यानी मांडले आहे.तोत्के वादळामुळे व्यापारी व्यवस्थापनेवर झाडे कोसळून तसेच पावसाचे पाणी दुकानात गेल्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान झाले आहे. कृषी, न्याहारी निवास व होम स्टे पर्यटन प्रकल्पामध्ये कित्येक झाडे तुटून गेली आहेत कित्येक झाडे उन्मळून पडली आहेत जास्त करून किनारी भागात असलेल्या पर्यटन प्रकल्पात बागायती, इमारतीचा, कंपाऊंड वाँल, छप्पराचें मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसाचे तसेच समुद्राचे पाणी पर्यटन प्रकल्पात शिरून कित्येक इलेक्ट्रिक वस्तू खराब झाल्या आहेत तसेच जलक्रिडेला वापरणाऱ्या होड्यांचे नुकसान झाले आहे या अगोदर झालेल्या क्यार, निसर्ग, फयान वादळा मध्ये किनारपट्टी मध्ये झालेल्या नुकसानीत पर्यटन व्यवसायाकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही योग्य प्रकारे पंचनामा न झाल्यामुळे व्यावसायिकांस काहीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. असे देखील ते म्हणाले आहेत. तरी तोत्के वादळामुळे व्यापारी व पर्यटन व्यावसायिकांचे करोडो रुपये नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचा पंचनामा त्वरित करण्याचे आदेश देऊन नुकसान झालेल्या व्यावसायिकाना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याधिकारी यांच्या कडे केल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली आहे.
