तौक्ते चक्रीवादळाचा चौके गावाला तडाखा…

अनेक घरांची पडझड तर ठिकठिकाणी झाडे पडली उन्मळून_

*💫मालवण दि.१७-:* तौक्ते चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार माजविला असून या चक्रीवादळने चौके गावाला जबरदस्त तडाखा दिला आहे. चौके गावातील अनेक घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून तर काही ठिकाणी मोडून पडली आहेत चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे छप्पराचे पत्रे उडून गेले आहेत रविवारी पहाटे पासून सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरु झाल्याने चौके परिसरात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळपासून रस्त्याशेजारील कमकुवत झाडे कोसळण्याला सुरवात झाली.झाडाच्या फांद्या पडून अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटून पोल जमिनदोस्त झाले.अनेकंच्या घरावर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.तर काही ठिकाणी छप्परांचे पत्रे उडाले असून यामुळे अनेकांची मोठी वित्त हानी झाली.चौके बाजारपेठेत सर्वत्र पडझड झाली.रविवारी संध्याकाळपर्यंत वारा पाऊस चालू असल्याने नुकसान झालेल्या ठिकाणचा पंचयादी पुढील दोन दिवसात महसुल कडून करण्यात येणार आहे. रविवारी आणि आज दिवसभर वादळामुळे रस्त्याशेजारील झाडे पडल्याने रस्ते बंद पडले.विद्युत तारा पोल कोसळले दुपारनंतर महसुलचे कर्मचारी फक्त हजर होते.स्थानिक ग्रामस्थ तसेच चिरेखान व्यावसायिक यांनी उपलब्ध करुन दिलेल्या जे.सी.बी च्या सहाय्याने दूर केली..

You cannot copy content of this page