Headlines

Global Maharashtra Breaking News

*नारिेग्रे गावचे सुपुत्र उद्योजक अमेय शिंदे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

*नारिेग्रे ग्रामपंचायतीसह रामेश्वर प्रतिष्ठान अध्यक्ष भाई नरे यांना दिले पिपीईकिट* *💫देवगड दि.२१-:* नारिेग्रे गावचे सुपुत्र व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये वासतव्यास असलेले उद्योजक अमेय शिंदे यांनी रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मिठबांव सरपंच यांना ५० पिपिईकिट व नारिेग्रे ग्रामपंचायतीला २५ पिपिईकिट दिले आहेत. उद्योजक अमेय शिंदे यांनी देवगड तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू…

Read Full News

शेर्ले पानोसेवाडी साकव कोसळला..

तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा : मुख्य मार्गाशी संपर्क तुटणार_ *💫बांदा दि.२१-:* तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा शेर्ले गावाला बसला. पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पानोसेवाडीकडे जाणार्‍या मार्गावरील  साकवाचा अर्ध्याहुन अधिक भाग कोसळला. त्यामुळे पानोसेवाडीतील ग्रामस्थांचा मुख्य मार्गाशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने साकवची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी सरपंच उदय धुरी यांनी केली आहे. तसेच आठ दिवसात ठोस…

Read Full News

*ना. विजय वडेट्टीवार यांनी कणकवली विजयभवन येथे दिली भेट

*खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांच्याकडून घेतला नुकसानीचा आढावा *💫कणकवली दि.२१-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे खार जमीन विकास,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून आज सायंकाळी त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या विजयभवन कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. दरम्यान खासदार विनायक राऊत,…

Read Full News

*पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे सावंतवाडी तालुका तर्फे स्वागत

*तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत* *💫सावंतवाडी दि.२१-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आले असता, काँग्रेस सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे उपतालुका अध्यक्ष समीर वंजारी बबन डिसोजा आदी उपस्थित होते

Read Full News

रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील वीजपुरवठ्याच्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून महावितरणचे कौतुक…

*💫सिंधुदुर्ग दि.२१-:* ‘तौक्ते’ चक्रीवादळाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा तडाखा दिल्याने वीजयंत्रणेचे जबरदस्त नुकसान झाले आहे. त्यात कोरोना संसर्गाची आपत्कालीन परिस्थिती असल्याने मोठे व कोविड रुग्णालये, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प, मोबाईल टॉवर, पाणीपुरवठा, घरगुती व इतर ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने नियोजनबद्ध सुरु केलेल्या युद्धपातळीवरील कामांचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी दौऱ्यात कौतुक…

Read Full News

*सहकार व पणन मंत्री बाळा पाटील येणार जिल्हा दौऱ्यावर

*चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी सिंधुदुर्गनगरी-: सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील हे दिनांक 22 मे 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार दिनांक 22 मे 2021 रोजी सकाळी 10.30 वा. करुळ, ता. वैभववाडी येथील तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, सकाळी 11.00 वा. करुळ येथून नाधवडे, ता. वैभववाडीकडे…

Read Full News

नुकसानग्रस्त एकाही कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही…

*पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा शब्द; जिल्हा युवक कॉंग्रेस प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी दिली माहिती मालवण (प्रतिनिधी) वादळातील नुकसानग्रस्त कोणत्याही कुटुंबावर अन्याय होणार नाही. मी स्वतः आलो आहे, कोकण हे माझं देखील एक कुटुंब आहे. कोणी अधिकारी तलाठी आपल्या कामात हयगय करत असतील तर मला सांगा प्रत्येक कार्यकर्त्याने असच जनतेच्या संपर्कात रहा. नुकसानग्रस्तांना १००% मदत…

Read Full News

*वैभववाडी तालुक्यास दिलेला शब्द पालकमंत्र्यांनी तात्काळ केला पूर्ण

तीन जनरेटर वैभववाडी तालुक्यास प्राप्त; सेनेच्या माध्यमातून नुकसान ग्रस्तांना सिमेंट पत्र्याचेही केले वाटप* *💫वैभववाडी दि.२१-:* वैभववाडी तालुक्याला तीन जनरेटर प्राप्त झाले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी या जनरेटरची घोषणा केली होती. त्याची तत्काळ पूर्तता करण्यात आली आहे. शिवाय शिवसेनेच्या वतीने नुकसानग्रस्त नागरिकांना सिमेंट पत्र्यांचेही वाटप करण्यात आले आहे. चक्रीवादळाने सर्वांचीच दयनीय अवस्था झाली. या…

Read Full News

पुनर्वसन मंत्र्यांविरोधात निदर्शने केल्याने मराठा आंदोलकाना घेतले ताब्यात

मराठा समाजाने निषेध केल्याने पोलिसांची कारवाई ओरोस प्रतिनिधी:- मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेधार्थ निषेध करण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकवर दमदाटी केल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले होते. यावेळी मराठा समाजातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत मंत्री विजय वडेट्टीवार यांचा निषेध व्यक्त…

Read Full News

प्राथमिक शिक्षक समितीच्या ऑक्सीजन प्लांटला मदत करा

सावंतवाडी शाखेचे आवाहन *बांदा*:-सध्या देशात कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हयात आॅक्सिजन प्लॉट व तत्सम आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक वर्गाकडून स्वच्छेने मदतनिधी जमा करण्यात येत असून सावंतवाडी तालुक्यातील शिक्षकांनीही या…

Read Full News

You cannot copy content of this page