नुकसानग्रस्त एकाही कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही…

*पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा शब्द; जिल्हा युवक कॉंग्रेस प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी दिली माहिती

मालवण (प्रतिनिधी) वादळातील नुकसानग्रस्त कोणत्याही कुटुंबावर अन्याय होणार नाही. मी स्वतः आलो आहे, कोकण हे माझं देखील एक कुटुंब आहे. कोणी अधिकारी तलाठी आपल्या कामात हयगय करत असतील तर मला सांगा प्रत्येक कार्यकर्त्याने असच जनतेच्या संपर्कात रहा. नुकसानग्रस्तांना १००% मदत पुरवणार, एकाही कुटुंबाला वंचित राहू देणार नाही, असे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितल्याची माहिती जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी दिली आहे. तौक्ते वादळामुळे मालवण तालुक्यात मोठी हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा युवक काँग्रेस वतीने मालवण तालुक्यातील तारकर्ली, काळेथर, देवबाग, वायरी, कोळंब, रेवंडी, मालवण शहर या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली. चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची ओरोस येथे जिल्हा युवक अध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा युवक काँग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर, माजी सभापती देवानंद चिंदरकर, युवक विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मंदार शिरसाट, उपाध्यक्षा पल्लवी तारी, तालुकाध्यक्ष अमृत राऊळ, शहराध्यक्ष गणेश पाडगावकर व युवक काँग्रेसचे इतर पदाधिकारी यांनी भेट घेतली. यावेळी मालवण तालुक्यातील नुकसानीबाबत युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मंत्र्यांना माहिती देण्यात आली. गेले पाच दिवस वाडी वाडीत नागरिक उन्मळलेली झाडे तोडून देण्यापासून ते तुटलेल्या छपराच्या दुरुस्ती पासून आज नागरिक एकमेकांना सहकार्य करत आहेत. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमृत राऊळ हे देवबाग मध्ये स्वतः फांद्या तोडायचा कटर घेऊन कार्यकर्त्या सोबत घरावर पडलेल्या फांद्या तोडत आहेत. कार्यकर्ते या कुटुंबातील नागरिकांना यथाशक्ती मदत करत आहेत. जिल्ह्यातील मातीची कौलारू घरे तर जमीनदोस्त झाली असून ती काही लाख खर्च केल्याशिवाय उभी राहणे आता शक्यच नाही. पर्यटन नगरी असल्याने नव्याने निर्माण झालेल्या न्याहारी निवासांची देखील पत्राशेड तुटून नुकसान झाले आहे. कोरोना काळात लहान सहान व्यवसाय देखील बंद असल्याने शासनाच्या मदतीची अपेक्षा नागरिक करत असून या अगोदरची येऊन गेलेली वादळं नुकसानभरपाई न देताच गेली. झाडे उन्मळून पडल्याने लाईट पोल देखील तुटले असून गेले ६ दिवस विना लाईट नागरिक राहत आहेत त्यामुळे नव्या पोलांची ट्रान्सफार्मरची उभारणी तत्काळ करणं गरजेचं आहे, अशी परिस्थिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी मत्र्यांसमोर मांडली.

You cannot copy content of this page