*सहकार व पणन मंत्री बाळा पाटील येणार जिल्हा दौऱ्यावर

*चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी

सिंधुदुर्गनगरी-: सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील हे दिनांक 22 मे 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार दिनांक 22 मे 2021 रोजी सकाळी 10.30 वा. करुळ, ता. वैभववाडी येथील तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, सकाळी 11.00 वा. करुळ येथून नाधवडे, ता. वैभववाडीकडे प्रयाण, सकाळी 11.30 वा. नाधवडे, ता. वैभववाडी येथील तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, दुपारी 12.00 वा. नाधवडे येथून मालवणकडे प्रयाण, दुपारी 1.30 वा. वायरी व दांडी ता. मालवण येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, दुपारी 3.30 वा. वायरी येथून उभादांडा, ता. वेंगुर्लाकडे प्रयाण, दुपारी 4.15 वा. उभादांडा ता. वेंगुर्ला येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेली नुकसान पाहणी, सोईनुसार उभादांडा ता. वेंगुर्ला येथून आंबोली घाट मार्गे कोल्हापूरकडे प्रयाण. 00000

You cannot copy content of this page