सावंतवाडी शाखेचे आवाहन
*बांदा*:-सध्या देशात कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हयात आॅक्सिजन प्लॉट व तत्सम आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक वर्गाकडून स्वच्छेने मदतनिधी जमा करण्यात येत असून सावंतवाडी तालुक्यातील शिक्षकांनीही या उपक्रमाला सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन सावंतवाडी तालुका अध्यक्ष सतिश राऊळ , सचिव श्री.अमोल कोळी व जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात ४०लाखाहून अधिक मदतनिधी उभारला जाणार असून यामध्ये सावंतवाडी तालुक्याचे भरीव योगदान रहावे यासाठी शिक्षकांनी आर्थिक योगदान देऊन या पवित्र उपक्रमात सहभागी होण्यासाठी तालुकाअध्यक्ष श्री.सतीश राऊळ (9423880370)आणि सचिव अमोल कोळी (9405552220)यांच्याशी संपर्क करावा.
