पुनर्वसन मंत्र्यांविरोधात निदर्शने केल्याने मराठा आंदोलकाना घेतले ताब्यात

मराठा समाजाने निषेध केल्याने पोलिसांची कारवाई

ओरोस प्रतिनिधी:- मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेधार्थ निषेध करण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकवर दमदाटी केल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले होते. यावेळी मराठा समाजातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत मंत्री विजय वडेट्टीवार यांचा निषेध व्यक्त केला. त्यावेळी उपस्थित ऍड सुहास सावंत, पणदूर सरपंच दादा साईल, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, रुपेश बिडये, भूषण राणे, दिनेश महादगुत, दिनेश वारंग, केदार राऊळ, वैभव जाधव, प्रथमेश परब, अवलेगाव सरपंच सुनील सावंत, निलेश परब, प्रशांत राणे, सुंदर सावंत, राजवीर पाटील, आशिष काष्टी, विष्णू धुरी, आदी मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

You cannot copy content of this page