*नारिेग्रे ग्रामपंचायतीसह रामेश्वर प्रतिष्ठान अध्यक्ष भाई नरे यांना दिले पिपीईकिट*
*💫देवगड दि.२१-:* नारिेग्रे गावचे सुपुत्र व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये वासतव्यास असलेले उद्योजक अमेय शिंदे यांनी रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मिठबांव सरपंच यांना ५० पिपिईकिट व नारिेग्रे ग्रामपंचायतीला २५ पिपिईकिट दिले आहेत. उद्योजक अमेय शिंदे यांनी देवगड तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यास रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे व त्यांचे सहकारीच पिपिईकिट घालून मृतदेहाचे अंतविधी करत आहेत. अश्या समाजसेवा करणा-या भाई नरे व त्यांच्या सहकार-यांना उद्योजक अमेय शिंदे यांनी ५० पिपिईकिट दिले आहेत. तर ते नारिेग्रे गावचे सुपुत्र असल्याने नारिेग्रे ग्रामपंचायतीला २५ पिपिईकिट ग्रामपंचायत सदस्यांकडे सुपूर्द केले आहेत. यावेळी उद्योजक अमेय शिंदे बोलताना म्हणाले कि, देवगड तालुका हा आपला तालुका असून या तालुक्यामधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता कामा नये यासाठी कोरोना विषाणूविषयक सर्व नियम आपण पाळले पाहिजेत. रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे यांनी तालुक्यातील अनेक गावांमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली आहे. पॉझिटिव्ह मृतदेहांच्या जवळ कोणीही ग्रामस्थ जवळ जात नसल्यामुळे अश्या परिस्थितीमध्ये भाई नरे व त्यांचे सहकारी कोरोना विषाणूच्या काळामध्ये सध्या कोरोना योध्दा ठरत आहेत. याच कार्याची दखल घेउन शिंदे यांनी भाई नरे व त्यांच्या सहका-यांना ५० पिपिईकिट दिले आहेत.
