निखिल कोंडीये यांनी जोडले ‘रक्ताचे’नाते…

बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्ताची होती आवश्यकता;’रक्तदानासाठी तरुणांनी पुढे येणे’ ही आदर्शवत बाब

*💫सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी येथे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात श्रद्धा पाटील या रुग्णाना बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता होती.श्री.निखिल कोंडीये यांनी रक्तदान करत रुग्णाचे प्राण वाचवले.याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान रक्तदान करण्यासंबंधी माजी शिक्षण आरोग्य सभापती श्री.मंगेश तळवणेकर आणि युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्यातर्फे सोशल मीडिया च्या माध्यमातून आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत श्री. कोंडीये यांनी रक्तदान केले.रात्री-अपरात्री येत कोंडीये यांनी रक्तदान केल्याबद्दल श्री.मंगेश तळवणेकर आणि श्री.देव्या सूर्याजी यांनी निखिल कोंडीये यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page