Headlines

शेर्ले पानोसेवाडी साकव कोसळला..

तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा : मुख्य मार्गाशी संपर्क तुटणार_

*💫बांदा दि.२१-:* तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा शेर्ले गावाला बसला. पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पानोसेवाडीकडे जाणार्‍या मार्गावरील  साकवाचा अर्ध्याहुन अधिक भाग कोसळला. त्यामुळे पानोसेवाडीतील ग्रामस्थांचा मुख्य मार्गाशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने साकवची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी सरपंच उदय धुरी यांनी केली आहे. तसेच आठ दिवसात ठोस कार्यवाही न झाल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा पानोसेवाडी ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. शेर्ले -पानोसेवाडी हा अतिदुर्गम भाग असून वाडीतील ग्रामस्थांना मुख्य मार्गावर येण्यासाठी केवळ एकच मातीचा मार्ग आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी येथील ओहोळावर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा सावक बांधण्यात आला होता. सदर सकवाचा भाग काहीसा कोसळल्याने मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. अखेर रविवारी झालेल्या तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात या साकवाचा   अर्ध्याहून अधिक भाग कोसळला.  सरपंच उदय धुरी यांनी कोसळलेल्या साकवाची  पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या. सद्य‍ा सावकची स्थीती कधीही कोसळेल अशा अवस्थेत आहे. स‍ाकव दुरूस्तीसाठी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करण्याचे आश्वासन सरपंच धुरी यांनी ग्रामस्थांना दिले. तर आठ दिवसात साकवची दुरूस्तीबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

You cannot copy content of this page