Headlines

Global Maharashtra Breaking News

निवती समुद्रात जाळ्यात अडकलेल्या कासवाची सुटका…!

⚡मालवण ता.३१-:वेंगुर्ले निवती लाईट हाऊस जवळील समुद्रात घोस्ट नेटमध्ये अडकलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाची श्रीकृष्ण बोटिंग ग्रुप, देवबागचे बोट मास्टर किशोर राऊळ यांनी सुटका करून जीवदान दिले. समुद्रातील वाढत्या प्रदूषणाचा समुद्री कासवांना मोठा फटका बसत असून समुद्रात टाकून दिलेल्या मच्छीमारी जाळ्यांमध्ये म्हणजेच घोस्ट नेटमध्ये कासवे अडकून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. अशी जाळ्यात अडकलेली कासवे…

Read Full News

जिल्हास्तरीय मानक वर्तनी परीक्षेत खुशी गावडे प्रथम…!

⚡सावंतवाडी ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ आयोजित स्वर्गीय श्री. विजयकुमार माळगावकर स्मृती मानक वर्तनी परीक्षा शैक्षणिक वर्ष-2025/ 26 या परीक्षेत मिलाग्रीस हायस्कूलच्या इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या कु. खुशी ज्ञानू गावडे हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय संपादन केले आहे. प्रमाणपत्र,रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान करण्यात आला आहे.तिला हिंदी विषयासाठी इयत्ता पाचवी…

Read Full News

मालवणच्या समुद्रात एलईडी लाईट चा झगमगाट…

शेकडो परराज्यातील पर्ससीन टॉलर्सचा समुद्रात धुमाकूळ:माशांच्या लुटीने मच्छिमार संतप्त.. ⚡मालवण ता.३०-:एलईडी लाईट पर्ससिन मासेमारीला महाराष्ट्रात बंदी असूनही मालवणच्या समुद्रात शेकडोंच्या संख्येने एलईडी लाईट पर्ससीनचा धुमाकूळ सुरू असून रात्रीच्या वेळी समुद्रात या मासेमारीचां लखलखाट किनाऱ्यावरूनच दिसून येत आहे. मात्र दुर्दैवाने एलईडी लाईट मासेमारीचा हा लखलखाट मत्स्य विभाग व मत्स्यमंत्र्यांना दिसत नाही. या अतिरेकी मासेमारीवर मत्स्य विभागाकडून…

Read Full News

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडमध्ये सायकल रॅलीचे आयोजन…

⚡देवगड, ता.३०-:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देवगड मंडल भाजपच्या वतीने ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता इको व्हील ग्रुप सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपा सरचिटणीस योगेश चांदोस्कर, तालुका उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, युवा मोर्चा देवगड-जामसंडे शहराध्यक्ष दयानंद…

Read Full News

स्वच्छ भारत 2.0 अंतर्गत देवगड-जामसांडे नगरपंचायतीला आधुनिक सक्शन व जेटिंग व्हॅन…

⚡देवगड ता.३०-: स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सौजन्याने नगरपंचायतीला अत्याधुनिक सक्शन व्हॅन व जेटिंग व्हॅन मंजूर करून देण्यात आली आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरला आहे. देवगड-जामसांडे नगरपंचायतीचे स्वच्छता सभापती बुवा तारी यांनी माहिती दिली या अंतर्गत पुरवण्यात आलेल्या वाहनांची क्षमता सुमारे 3,000 लिटर इतकी…

Read Full News

देवगडमध्ये संरक्षक भिंत व सुशोभीकरण प्रकल्पाला सुरुवात; १ कोटींचा निधी मंजूर…

⚡देवगड, ता.३०-: पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि नगरपंचायत स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांच्या पाठपुराव्यामुळे देवगडमधील विठ्ठलवाडी पोकळे नाका ते किल्ला दत्त मंदिर या मार्गाच्या विकासाला गती मिळाली आहे. जिल्हा वार्षिक नियोजन समितीअंतर्गत या मार्गावर संरक्षक भिंत उभारणे व सुशोभीकरणासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाच्या पहिल्या…

Read Full News

कणकवलीत पाणीटंचाईची भीती फोल…

दररोज २० लाख लिटर पाणीपुरवठा सुरूच – नगराध्यक्ष संदेश पारकर.. ⚡कणकवली ता.३०-: शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, कणकवली नगरपंचायतीच्या नळ योजनेद्वारे दररोज सुमारे २० लाख लिटर पाणीपुरवठा नियमितपणे केला जात आहे. सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असला तरी शहरात कोणतीही भीषण पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्पष्ट केले. कणकवली नगरपंचायतीत माध्यमांशी…

Read Full News

दांडेली येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.३०-: जय हनुमान मित्र मंडळ २०१८ आयोजित श्री देव हनुमान जन्मोत्सव निमित्त गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी श्री हनुमान मंदिर दांडेली आरोस बाजार मंदिरात श्री हनुमान सहस्रनाम याक आधारित कार्यक्रम करण्यात येणार आहे तसेच सकाळी ११ वाजता श्री हनुमान सहस्रनाम याग ,दुपारी १ वाजता महाआरती व महाप्रसाद तसेच रात्रौ ७ वाजता लौकिक प्राप्त आरोलकर…

Read Full News

शारदा विद्यामंदिर सावळवाडा शाळेचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश…

अनुष्का गवंडे उंचउडीमध्ये प्रथम तर शुभ्रा गवंडे लांबउडीमध्ये द्वितीय.. ⚡सावंतवाडी ता.३०-: तालुक्यातील मळगाव सावळवाडा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शारदा विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.अनुष्का देवदास गवंडे हिने उंचउडी मध्ये प्रथम क्रमांक तर शुभ्रा परशुराम गवंडे हिने लांबउडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सन…

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘क्वांटेक्झेरा 2026’ उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.३०-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित ‘क्वांटेक्झेरा 2026’ हा टेक फेस्ट मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध तांत्रिक व सर्जनशील स्पर्धांसोबतच ऑटो शोमधून वेग, ताकद आणि नाविन्यपूर्ण अभियांत्रिकीचा थरार अनुभवायला मिळाला. पहिल्या दिवशी टू-व्हीलर, तर दुसऱ्या दिवशी फोर-व्हीलर वाहनांनी मैदानावर विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर केली. सहभागी वाहनांमधून इंजिनची कार्यक्षमता,…

Read Full News

You cannot copy content of this page