स्वच्छ भारत 2.0 अंतर्गत देवगड-जामसांडे नगरपंचायतीला आधुनिक सक्शन व जेटिंग व्हॅन…

⚡देवगड ता.३०-: स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सौजन्याने नगरपंचायतीला अत्याधुनिक सक्शन व्हॅन व जेटिंग व्हॅन मंजूर करून देण्यात आली आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरला आहे. देवगड-जामसांडे नगरपंचायतीचे स्वच्छता सभापती बुवा तारी यांनी माहिती दिली

या अंतर्गत पुरवण्यात आलेल्या वाहनांची क्षमता सुमारे 3,000 लिटर इतकी असून, हायड्रॉलिक प्रणालीसह ही यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. सक्शन व्हॅनद्वारे गटारातील सांडपाणी व घाण प्रभावीपणे उपसता येणार आहे, तर जेटिंग मशीनच्या सहाय्याने बंद असलेल्या पाईपची सफाई अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. टॉयलेटच्या टाक्या उपसणे या कामाला गती मिळणार आहे.

या वाहनाची अंदाजे किंमत 40 लाख रुपयांपेक्षा अधिक असून, शहर अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुबक ठेवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

या आधुनिक साधनसामग्रीमुळे देवगड-जामसांडे शहरातील स्वच्छता व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होऊन नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरणाचा लाभ मिळणार आहे. असे मत बुवा तारी यांनी व्यक्त केले

(बातमीसाठी ववापरलेले चित्र प्रातिनिधीक आहे ते वास्तविक असेल असे नाही )

You cannot copy content of this page