नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडमध्ये सायकल रॅलीचे आयोजन…

⚡देवगड, ता.३०-:
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देवगड मंडल भाजपच्या वतीने ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता इको व्हील ग्रुप सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भाजपा सरचिटणीस योगेश चांदोस्कर, तालुका उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, युवा मोर्चा देवगड-जामसंडे शहराध्यक्ष दयानंद पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष सर्फराज शेख आणि सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते.

इको व्हील ग्रुपच्या वतीने आयोजित सायकल रॅली दोन गटांमध्ये होणार आहे. यामध्ये १२ वर्षांपर्यंतचा शालेय गट आणि खुला गट यांचा समावेश आहे. शालेय गटासाठी ११ किलोमीटर तर खुल्या गटासाठी २५ किलोमीटर अंतर निश्चित करण्यात आले आहे.

शालेय गटाची रॅली जामसंडे भाजपा कार्यालय–कुणकेश्वर–जामसंडे भाजपा कार्यालय असा मार्ग पार करेल. तर खुल्या गटाची रॅली जामसंडे भाजपा कार्यालय–कातवण पेट्रोल पंप–जामसंडे भाजपा कार्यालय या मार्गावर होणार आहे.

या सायकल रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सायकलस्वारासाठी हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच रॅली पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागी स्पर्धकांना मोफत टी-शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page