⚡सावंतवाडी ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ आयोजित स्वर्गीय श्री. विजयकुमार माळगावकर स्मृती मानक वर्तनी परीक्षा शैक्षणिक वर्ष-2025/ 26 या परीक्षेत मिलाग्रीस हायस्कूलच्या इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या कु. खुशी ज्ञानू गावडे हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय संपादन केले आहे. प्रमाणपत्र,रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान करण्यात आला आहे.
तिला हिंदी विषयासाठी इयत्ता पाचवी ते नववी पर्यंत प्रशालेचे शिक्षक श्री सुशांत गावडे, श्रीम.वर्षा देवण,श्री दत्ताराम नाईक, श्री गणेश डिचोलकर व श्रीम. अँटॉनेट पिंटो यांचे मार्गदर्शन लाभले.
तिचा या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका श्रीम.संध्या मुणगेकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्हास्तरीय मानक वर्तनी परीक्षेत खुशी गावडे प्रथम…!
