निवती समुद्रात जाळ्यात अडकलेल्या कासवाची सुटका…!

⚡मालवण ता.३१-:
वेंगुर्ले निवती लाईट हाऊस जवळील समुद्रात घोस्ट नेटमध्ये अडकलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाची श्रीकृष्ण बोटिंग ग्रुप, देवबागचे बोट मास्टर किशोर राऊळ यांनी सुटका करून जीवदान दिले.

समुद्रातील वाढत्या प्रदूषणाचा समुद्री कासवांना मोठा फटका बसत असून समुद्रात टाकून दिलेल्या मच्छीमारी जाळ्यांमध्ये म्हणजेच घोस्ट नेटमध्ये कासवे अडकून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. अशी जाळ्यात अडकलेली कासवे अनेकवेळा दिसून येऊन त्यांना मच्छिमार व प्राणीमित्रांकडून वाचविले जात आहे.

या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला निवती लाईट हाऊस जवळील समुद्रात पर्यटक समुद्र सफरीला गेले असता पाण्याच्या पृष्ठभागावर एक समुद्री कासव हे घोस्ट नेटमध्ये म्हणजे समुद्रातील तुटलेल्या जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत श्रीकृष्ण बोटिंग ग्रुप, देवबागचे बोट मास्टर किशोर राऊळ यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर किशोर राऊळ यांनी योग्य ती काळजी घेत त्या ऑलिव्ह रिडले कासवाची घोस्ट नेटमधून सुटका करत त्याला पुन्हा समुद्रात सोडले.

You cannot copy content of this page