दांडेली येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.३०-: जय हनुमान मित्र मंडळ २०१८ आयोजित श्री देव हनुमान जन्मोत्सव निमित्त गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी श्री हनुमान मंदिर दांडेली आरोस बाजार मंदिरात श्री हनुमान सहस्रनाम याक आधारित कार्यक्रम करण्यात येणार आहे तसेच सकाळी ११ वाजता श्री हनुमान सहस्रनाम याग ,दुपारी १ वाजता महाआरती व महाप्रसाद तसेच रात्रौ ७ वाजता लौकिक प्राप्त आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ आरवली यांचा “पुत्र कामेष्ठी यज्ञ “हा नाट्य प्रयोग .

बुधवार दिनांक १ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता प्रति वर्षाप्रमाणे श्री हनुमान कला क्रीडा मंडळ आरोस दांडेली ,यांचा व परेश नाईक गोवा लिखित दोन अंकी मालवणी नाटक ” दिवाळी”

या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन जय हनुमान मित्र मंडळ २०१८ आणि आरोस दांडेली ग्रामस्थ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page