Headlines

Global Maharashtra Breaking News

तळाशिल धुपप्रतिबंक बंधार्‍याचे रखडलेले १४०० मीटरचे काम तातडीने पुर्ण करा

तळाशिल ग्राम विकास मंडळाने मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे वेधले लक्ष *💫मालवण दि.२४-:* उधाणाच्या वेळी समुद्राचा तळाशिल गावाला धोका निर्माण झाला आहे.या पावसात अनेक वीज पोल समुद्राने गिळंकृत केले आहेत.रस्त्यापलीकडील घरे भीतीच्या छायेत आहेत.गेली अनेक वर्षे मालवण तालुक्यातील तळाशिल येथील समुद्र किनारी धुपप्रतिबंक बंधार्‍याचे रखडलेले १४०० मीटरचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी तळाशिल ग्राम विकास मंडळाने…

Read Full News

आयडियल इंग्लिश स्कूलच्या एस.एस.सी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे गौरव

*💫कणकवली दि.२४-:* ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वरवडेचा शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी) परीक्षेचा निकाल १००% लागला आहे. यामध्ये कु.शाल्मली नानल ९९.८० % गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक व तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला, कु.प्रियांका आनंद पारकर हिने ९७.२०% गुण व कु.मंदार दिगंबर सावंत ९६.२०% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला…

Read Full News

आकेरी घाटी येथे ११ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाच्या कारवाईत सावंतवाडीतील दोन युवक ताब्यात;न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी *💫सावंतवाडी ता.२४-:* सावंतवाडी ते वेंगुर्ले अशी गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने आकेरी घाटी येथे सापळा रचत ११ हजार रुपये किमतीचा ३६७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. याप्रकरणी सावंतवाडीतील दोघा युवकांना अटक करून ताब्यात घेण्यात आले….

Read Full News

“त्या” नौकेचा परवाना व नोंदणी रद्द करा

आचरा येथील किशोरी नौकेबाबत मालवण तहसीलदार अजय पाटणे यांचे मत्स्य विभागास आदेश *💫मालवण दि.२४-:* मालवण बंदर हद्दीतील जलधीक्षेत्रात एप्रिल महिन्यात सापडून आलेल्या किशोरी या नौकेने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ मधील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी अभिनिर्णय अधिकारी तथा मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी नौकेचा मासेमारी परवाना व नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत कारवाई करावी असे आदेश…

Read Full News

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत प्रथमेश चव्हाणचे यश

*💫मालवण दि.२४-:* मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेचा विद्यार्थी प्रथमेश प्रमोद चव्हाण (इ. चौथी) याने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत १०० पैकी ८७ गुण मिळवीत सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याला शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कृषी उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होणार

मालवण (प्रतिनिधी) मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वॉल खारेपाटण ते पत्रादेवी या सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कृषी उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून कळविले आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने माजी केंद्रीय…

Read Full News

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कुडाळ – मालवण युवक काँग्रेसच्या माध्यमातून सहकार्य दौरा

*💫मालवण दि.२४-:* रत्नागिरी मध्ये चिपळूण व इतर काही भागात आलेल्या पूरस्थितीमुळे पूरग्रस्त भागातील नागरिक हतबल झाले या नागरिकांसाठी असून या नागरिकांना कुडाळ – मालवण विधानसभा युवक काँग्रेसतर्फे मदत करण्यात येणार असून या मदतकार्यात सर्वांनी सहकार्य करावे यासाठी सहकार्य दौरा काढण्यात येणार आहे. यामध्ये इच्छुकांनी जमेल ती मदत वस्तू रुपात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा करावी, असे…

Read Full News

स्पर्धा परिक्षांबाबत मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या करियर गायडन्स व प्लेसमेंट सेल तसेच द युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार आयोजित केले असून त्यामध्ये MPSC-UPSC/SSC/IBPS यासह इतरही सर्व ‘स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी’ या विषयांवर ऑनलाईन माध्यमाद्वारे मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले…

Read Full News

खारेपाटण पूलावरील वाहतुक अखेर सुरू

पावसाचा जोर ओसरल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात *💫कणकवली दि.२४-:* पावसाने धुमाकूळ घालत दळणवळणाचे सारे मार्ग बंद केल्यानंतर काल सायंकाळपासून थोडी विश्रांती घेतली .आज सकाळ पासून पावसाचा जोर ओसरल्यावर खारेपाटण शुकनदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने खारेपाटण ब्रिटीश कालीन पुलावरील वाहतूक ही सुरू करण्यात आली आहे गेले पाच ते सहा दिवस सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसाने खारेपाटण…

Read Full News

जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी प्रवेश परीक्षा ११ ऑगस्ट रोजी

*💫सावंतवाडी दि.२४-:* सांगेली-सावरवाड येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावी प्रवेशासाठी निवड चाचणी प्रवेश परीक्षा बुधवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर होत आहे. या निवड चाचणीसाठी आवेदन केलेल्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/index.aspx या संकेतस्थळावरुन आपली प्रवेश पत्रे डाऊनलोड करून घ्यावयाची आहेत. प्रवेश पत्रासोबत परीक्षा केंद्रावर वेळेत…

Read Full News

You cannot copy content of this page