*लघु पाटबंधारे विभागाकडून माहिती
*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* नरडवे धरण प्रकलपांतर्गत बाधित झालेल्या नागरिकांना सानुग्रह अनुदान वाटपाचा कार्यक्रम नरडवे धरणग्रस्त समन्वय समितिने उधळून लावल्यानंतर आज धरणग्रस्तांनी लघु पाटबंधारे विभागात मोबदल्यासाठी हजेरी लावली. यावेळी येथील गर्दी होवू नये तसेच येथील अनुदान वाटप कार्यक्रमावर कोणताही परिणाम होवू नये याची जिल्हाधिकारी कार्यालयातील लघु पाटबंधारे विभागाकडून विभागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या पोलीस बंदोबस्तात प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे अशी माहिती लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. नरडवे धरण प्रकल्पात बाधित झालेल्या भैरवगाव, यवतेश्वर, जांभळगाव या गावातील बाधित झालेल्या धरण ग्रस्तांसाठी शासनाकडून १२ कोटी २१ लाख रुपयांचे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. या प्रकल्पातील २११ धरणग्रस्तांना मोबदला देण्यासाठी १ व २ डिसेंबर या दोन दिवशी नरडवे ग्रामपंचायत कार्यालय येथे सानुग्रह अनुदान वाटपासाठी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. मात्र हा अनुदान वाटपाचा कार्यक्रम नरडवे धरणग्रस्त समन्वय समितीने उघडलून लावला होता. यानंतर आज सिंधुदुर्गनगरी येथील लघु पाटबंधारे विभागात या धरण ग्रस्तांची गर्दी होती तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याबाबत लघु पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता नरडवे धरण प्रकल्प ग्रस्तांना त्यांचा मोबदला वाटपासाठी नरडवे ग्रामपंचायत येथे कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्प वेळी २११ धरणग्रस्तांना मोबदला वाटपाच्या नोटिसा काढण्यात आल्या होत्या. यातील १५४ जणांनी नोटिसा स्वीकारल्या होत्या. या कॅम्प साठी ४ टेबल वर ७ स्लॉट लावण्यात आले होते. यातील काही घरणगस्त मोबदला स्वीकारण्यास तयार होते. मात्र मोबदला वाटपाचे संपूर्ण विवरण पत्र मिसळावे, कोणाला किती व कसे याची माहिती मिळावी असे मागणी काहींनी करत मोबदला वाटपाला विरोध केला होता. मात्र प्रत्येक धरण ग्रस्ता ला किती मोबदला मिळणार याची माहिती देण्यात आली होती. मात्र अन्य व्यक्तींची माहिती दुसऱ्याला देता येत नसल्याने संपूर्ण विवरण पत्र कार्यालय देवू शकत नसल्याचे लघु पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. तरीही या वाटपाला विरोध झाल्याने १ व २ डिसेंबर रोजी मोबदल्याचे वाटप करण्यात आले नाही. असे लपा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र यात ज्या धरणग्रस्तांना मोबदला स्वीकारायचा होता त्यांचे नुकसान झाले होते. या धरणग्रस्तांनी आज गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात हजेरी लागत मोबदल्याची मागणी केल्याने या ठिकाणी मोबदला वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दरम्यान मोबदला वाटपाच्या ठिकाणी ग्रामस्थांची गर्दी होवू नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.