*💫सावंतवाडी दि.०३-:* सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला असून , या पार्श्वभूमीवर गुरुवारी या आंदोलनाच्या समर्थनात राज्यात सर्वत्र काँग्रेसने आंदोलन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी येथे प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सामाजिक अंतर राखून शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा व्यक्त करत जोरदार घोषणा बाजी केली आहे. या वेळी जिल्हाअध्यक्ष बाळा गावडे, उपाध्यक्ष ऍड.दिलीप नार्वेकर, तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर,तालुका उपाध्यक्ष सच्चीदानंद बुगडे ,तालुका सरचिटणीस अन्वर खान. शहर अध्यक्ष ऍड.राघवेंद्र नार्वेकर, युवक शहराध्यक्ष साद शेख, रुपेश आईर, विल्यम सालढाणा, राज पेडणेकर, माया डुबळे, संतोष मडगावकर, कौस्तुभ सामंत,जासमीन मुल्ला, संगीता सावंत, ऍड.विराज मसुरकर, मंजुषा डांगी, अमित डिसोझा आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सावंतवाडी तालुका कॉंग्रेसचा पाठिंबा
