माझे कुटूंब माझी जबाबदारी व कोरोना : संकट नव्हे जनजागृती या विषयावर होणार निबंध लेखन
*💫कणकवली दि.०३-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या ९ जानेवारी ला एक वर्ष पूर्ण होवून दुस-या वर्षात पदार्पण करीत असल्याने ९ डीसेंबर २०२० ते ९ जानेवारी २०२१ या कालावधीत विविध उपयुक्त सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत .यात स्वच्छता जनजागृती , शालेय मुलांसाठी निबंध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. संगीत कला अकादमी या संस्थेअंतर्गत स्थापन करून गावातील कलाकरांना एकत्र करून यातून ज्येष्ठ कलाकार यांना शासनातर्फे वृध्द कलाकार मानधन दिले जाते याकामी सदर कलाकारांचे प्रस्ताव करण्यासाठी पूर्ण सहकार्य या संस्थेचे असणार आहे . याचाच एक भाग म्हणून या संस्थेतर्फे शालेय मुलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नांदगाव गाव मर्यादीत असून याचे कारणही या कोरोना काळात विद्यार्थ्याना शिक्षणाची आवड टिकून राहावी या हेतूनेच गावातीलच यातून प्रत्येक प्रशालेतून अनुक्रमे ३ क्रमांक काढण्यात येणार असून शेवटी सर्व शाळांमधूनही अनुक्रमे ३ क्रमांक काढण्यात येवून सर्वांना पारितोषीके देवून गौरविण्यात येणार आहे . यामध्ये ५ वी त ७ व माध्यमिक ८ वी ते १० वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी असणार आहे .यासाठी ५ वी त ७ पर्यंत विद्यार्थ्यांना (१५० शब्द कमाल मर्यादा) कोरोना पार्श्वभूमीवर माझे कुटूंब माझी जबाबदारी असा विषय ठेवण्यात आला असून माध्यमिक ८ वी ते १० वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी (२५० शब्द कमाल मर्यादा) कोरोना : संकट नव्हे जनजागृती असा विषय ठेवण्यात आला आहे . कोरोना : संकट नव्हे जनजागृती यामध्ये कोविड १९ या आपत्ती मध्ये खरच काही शिकवलं का?स्वत:च्या जीवनशैलीबाबत आर्थीक स्तराबाबत ,कौटूंबिक वातावरणाबाबतचे व जिल्हा बाहेरून आलेल्या मग तो आपल्या घरातील असेल तरी क्वारंटाईन वेळी काय अनुभव आले हे सर्व यात समाविष्ट असणे आवश्यक आहे . तसेच शब्द मर्यादा जे वरील प्रमाणे बंधनकारक असेल ही स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका ठीकाणी होणार नसून प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांमार्फतच निबंध सुंदर हस्ताक्षरात लिहून या आपआपल्या प्रशालेच्या जवळ असणारे खालील प्रमाणे व्यक्तींच्या येथे जमा करावयाच्या आहेत . नांदगाव केंद्र शाळा नांदगाव नं.१ च्या मुलांनी वरील संस्था कार्यालय नांदगाव ओटव माईण फाटा (आरोग्य केंद्र जवळ ) नांदगाव मधलीवाडी प्रशालेच्या मुलांनी मंगेश बोभाटे यांच्या जवळ ,नांदगाव ऊर्दू प्रशालेच्या मुलांनी आयडीयल कॉम्प्युटर एज्यु.नांदगाव तिठा व नांदगाव सरस्वती हाय.मुलांनी वरील प्रमाणे प्रत्येक व्यक्तीकडे त्या त्या प्रमाणे देण्यात यावे यामध्ये स्वत:चे संपूर्ण नाव, प्रशालेचे नाव व इयत्ता लिहीण्यात यावेत तरी इच्छूकांनी अधिक माहीतीसाठी मो. ९०९६५६४४१० येथे संपर्क करावा असे आवाहन किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे