Headlines

Global Maharashtra Breaking News

लोकशाहीर सत्यशोधक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांची 1 ऑगस्ट रोजी ऑनलाईन जयंती

*⚡वैभववाडी दि.३१-:* लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनीतून आणि वाणीतून समाज प्रबोधन ही परंपरा कायम ठेवली. त्यांच्या याच विचारांचा आणि स्मृतींचा जागर करत समता प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, सत्यशोधक जनआंदोलन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक महिला आघाडी यांच्यावतीने १ ऑगस्ट, २०२१ रोजी अण्णा भाऊ साठे यांची जयंती ऑनलाईन साजरी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आॕनलाईन…

Read Full News

इन्सुली डोबाचीशेळ राष्ट्रवादीच्यावतीने लाईफ जॅकेट वाटप

अजून मदत करणार;राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.३१-:* गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इन्सुली भागाला देखील मोठा फटका बसला असून येथील बिलेवाडी गावठण,धुरीवाडी सावंतटेंब,कुडवटेंब डोबवाडी या भागात मोठे नुकसान झाले आहे. येथील डोबाशेळच्या स्थानिक ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले होते.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांना लाइफ जॅकेट प्रदान…

Read Full News

शेर्ले पुरग्रस्ताना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

रणरागिणी महिला सामाजिक संस्था मालवणचा उपक्रम *⚡मालवण दि.३१-:* रणरागिणी महिला सामाजिक संस्था मालवण तालुका या संस्थेच्या वतीने शेर्ले येथील पूरग्रस्त कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. रणरागिणी महिला सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी शेर्ले गावाला भेट देऊन पुरामध्ये नुकसान झालेल्या कुटुंबाना मदत सुपूर्द केली. यामध्ये तांदूळ, गहू, चणे, डाळ, मूग या अन्नधान्यासह साखर, चहा पावडर, कोलगेट आणि…

Read Full News

सांवतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २१ रुग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.३१-:* सावंतवाडी तालुक्यात आज २१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी ३, खासकिलवाडा ४, सबनीस वाडा १, तर ग्रामीण भागात कारिवडे १, माजगाव १, कोलगाव २, तळवडे २, माडखोल ३, मळगाव २,…

Read Full News

आशियेत पूरग्रस्त कुटुंबाला शासनाच्या वतीने धान्य वाटप

*⚡कणकवली दि.३१-:* कणकवली तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरात ज्यांच्या घरांमध्ये पाणी घुसले.त्या पूरग्रस्त कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून धान्य वाटप केले जात आहे.तहसीलदार रमेश पवार यांच्या सूचनेनुसार आशिये गावातील पूरग्रस्तांना शनिवारी रास्त धान्य दुकान या ठिकाणी माजी उपसभापती महेश गुरव यांच्या हस्ते सुनिल पुजारे यांना धान्य वाटप करण्यात आले. आशिये गावात एका कुटूंबाला १० किलो गहू,१०…

Read Full News

चिपळूण नगरपरिषदला 2 कोटीचा निधी

केंद्र सरकारचे माजी आम.प्रमोद जठार यांनी मानलेआभार *⚡कणकवली दि.३१-:* भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस माजी आम. प्रमोद जठार यांनी चिपळूण प्रांत कार्यालयात भेट दिली. यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी श्री पाटील, चिपळूण प्रांतसाहेब, तहसीलदार इत्यादी उपस्थित होते या चर्चेदरम्यान जठार यांनी राज्यसरकारने अद्याप तात्काळ करावयाची मदत 15000 अजून दिली नाही याबाबत नाराजी व्यक्त केली तसेच जर ती…

Read Full News

अर्जुन रावराणे विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे मेमरीकार्ड

नव्या प्रणालीमुळे नेटवर्कच्या समस्येची कटकट दुर होणार *⚡वैभववाडी ता.३१-:* तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट असलेले मेमरीकार्ड मोफत देण्यात आले. हिंदुश फांऊंडेशन अंधेरी या संस्थेच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना याच वाटप करण्यात आले. या नव्या प्रणालीमुळे नेटवर्कच्या समस्येची कटकट दुर होणार आहे. कोरोना काळात गेले दोन वर्षे शाळा बंद आहेत. आँनलाईन पद्धतीने शिक्षण…

Read Full News

ठाणे सिटीझन प्राईड पुरस्कार मंगला पवार यांना प्रदान

राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते वितरण;सौ पवार आहेत वैभवाडीच्या रहिवाशी *⚡वैभववाडी ता.३१-:* ठाणे जिल्हाच्यावतीने दिला जाणारा ठाणे सिटीझन प्राईड आव्हाड ठाणे जिल्हारुग्णालयातील सौ मंगला गोरख पवार यांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.पवाार ह्या वैभववाडीतील एडगाव च्या असून त्याचे अभिनंदन होत आहे. मंगला पवार या गेले तीस वर्ष आरोग्य विभागात रुग्णांना सेवा देण्याचं निस्वार्थीपणे…

Read Full News

भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव परुळेकर निधन

*⚡मालवण ता.३१-:* येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. वसंतराव गंगाराम परुळेकर (वय ९३) यांचे आज दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास मालवण बांगीवाडा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या श्री. परुळेकर यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मालवण बांगीवाडा येथील रहिवासी असणारे श्री. वसंतराव परुळेकर यांचा तीन वर्षांपूर्वी मालवणच्या…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी १५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४४ हजार ६३३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page