शेर्ले पुरग्रस्ताना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

रणरागिणी महिला सामाजिक संस्था मालवणचा उपक्रम

*⚡मालवण दि.३१-:* रणरागिणी महिला सामाजिक संस्था मालवण तालुका या संस्थेच्या वतीने शेर्ले येथील पूरग्रस्त कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. रणरागिणी महिला सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी शेर्ले गावाला भेट देऊन पुरामध्ये नुकसान झालेल्या कुटुंबाना मदत सुपूर्द केली. यामध्ये तांदूळ, गहू, चणे, डाळ, मूग या अन्नधान्यासह साखर, चहा पावडर, कोलगेट आणि कपडे इत्यादी जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. सुमारे ३५ कुटुंबाना ही मदत देण्यात आली. यावेळी रणरागिणी संस्था मालवणच्या अध्यक्षा नीलम शिंदे, उपाध्यक्षा विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, पूजा तोंडवळकर, सौरभी आमरे यासह तालुक्यातील इतर सदस्या उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page