इन्सुली डोबाचीशेळ राष्ट्रवादीच्यावतीने लाईफ जॅकेट वाटप

अजून मदत करणार;राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.३१-:* गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इन्सुली भागाला देखील मोठा फटका बसला असून येथील बिलेवाडी गावठण,धुरीवाडी सावंतटेंब,कुडवटेंब डोबवाडी या भागात मोठे नुकसान झाले आहे. येथील डोबाशेळच्या स्थानिक ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले होते.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांना लाइफ जॅकेट प्रदान करण्यात आले. तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या माध्यमातून अजून मदत पुरवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर इफ्तिकार राजगुरू संतोष संजय पालव, सुभाष तावडे, औदुंबर पालव, उमेश पेडणेकर,सुर्या पालव,दादा पालव,सुनील सावंत,प्रितेश पालव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page