लोकशाहीर सत्यशोधक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांची 1 ऑगस्ट रोजी ऑनलाईन जयंती

*⚡वैभववाडी दि.३१-:* लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनीतून आणि वाणीतून समाज प्रबोधन ही परंपरा कायम ठेवली. त्यांच्या याच विचारांचा आणि स्मृतींचा जागर करत समता प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, सत्यशोधक जनआंदोलन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक महिला आघाडी यांच्यावतीने १ ऑगस्ट, २०२१ रोजी अण्णा भाऊ साठे यांची जयंती ऑनलाईन साजरी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आॕनलाईन स्वरुपात घेण्यात येणार आहे. खाली दिलेल्या गुगल मिट लिंकवर क्लिक करून या कार्यक्रमात सहभाग घेता येईल. सायंकाळी ठिक ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची मांडणी दिपाली जाधव, प्रथमेश मणचेकर, रेणुका शिंगे, निलेश जाधव, विकास कदम यांनी केली आहे. प्रमुख मार्गदर्शन अमोल कांबळे करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश पेडणेकर करणार असून सूत्रसंचालन संतोष पेडणेकर करणार आहेत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उषकिरण सम्राट करणार आहेत. तर सुजय जाधव तांत्रिक सहाय्य करणार आहेत. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने सामिल होण्याचे आवाहन संस्थेचे सचिव अंकुश कदम आणि अध्यक्ष अमोल कांबळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page