अर्जुन रावराणे विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे मेमरीकार्ड

नव्या प्रणालीमुळे नेटवर्कच्या समस्येची कटकट दुर होणार

*⚡वैभववाडी ता.३१-:* तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट असलेले मेमरीकार्ड मोफत देण्यात आले. हिंदुश फांऊंडेशन अंधेरी या संस्थेच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना याच वाटप करण्यात आले. या नव्या प्रणालीमुळे नेटवर्कच्या समस्येची कटकट दुर होणार आहे. कोरोना काळात गेले दोन वर्षे शाळा बंद आहेत. आँनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र ग्रामीण भागात मोबाईलला आवश्यक असणारे नेटवर्क उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय व्हायची. यावर मुंबईतील हिंदुश फांऊंडेशन या संस्थेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नवी प्रणाली विकसित केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना मेमरीकार्डद्वारे अभ्यासाचे धडे शिकता येणार आहेत. तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालयात ही नवी प्रणाली यावर्षी सुरू करण्यात येत आहे. आज हिंदुश फांऊंडेशन व वैभववाडी तालुका शिक्षण संस्था यांच्या मार्फत अभ्यासक्रम समाविष्ट असलेल्या या मेमरीकार्डच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page