ठाणे सिटीझन प्राईड पुरस्कार मंगला पवार यांना प्रदान

राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते वितरण;सौ पवार आहेत वैभवाडीच्या रहिवाशी

*⚡वैभववाडी ता.३१-:* ठाणे जिल्हाच्यावतीने दिला जाणारा ठाणे सिटीझन प्राईड आव्हाड ठाणे जिल्हारुग्णालयातील सौ मंगला गोरख पवार यांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.पवाार ह्या वैभववाडीतील एडगाव च्या असून त्याचे अभिनंदन होत आहे. मंगला पवार या गेले तीस वर्ष आरोग्य विभागात रुग्णांना सेवा देण्याचं निस्वार्थीपणे काम करीत आहेत गेले दीड वर्ष कोविड सारख्या महाभयानक रोगाचा फैलाव असताना देखील रुग्णांना सेवा देण्याचे करीत होत्या. मंगला पवार यांच्या सेवेबद्दल हा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला मंगला पवार ह्या वैभववाडीतील एडगाव च्या असून त्याचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page