Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी 474 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 17 हजार 11 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4,हजार 148 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 474 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

आठवडाभरात तौक्ते नुकसानी वाटप सुरु होईल

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती;मालवण, देवगड, वेंगुर्लेतील नुकसानीची केली पाहणी *💫मालवण दि.२२-:* तौक्ते वादळामुळे मालवणसह वेंगुर्ला, देवगड तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत. घरांच्या नुकसानीचे पूर्ण होत आले असून फळबागायतींचे पंचनामेही दोन- चार दिवसात पूर्ण होतील. मदतीसाठी हात आखडता न घेता सढळ हाताने मदत करण्याची…

Read More

*नगरपालिकेच्या मैला गाडीला उपरलकर येथे अपघात*

*💫सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी नगरपालिकेच्या मैला गाडीला श्री. उपरलकर देवस्थान येथे अपघात झाला असून, या अपघातात दोन कर्मचारी किरकोळ जख्मी झाले आहेत. या दोन्ही कर्मचाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कंत्राटी स्वरूपात ही गाडी सेवा देत होती.

Read More

झोळंबे येथील २६ वर्षीय युवकाचे निधन…

*💫दोडामार्ग दि.२२सुमित दळवी-:* अमित सुधाकर गवस वय २६ राहणार झोळंबे, याचे अल्पशा आजाराने ओरोस जिल्हा रुग्णालयात शनिवारी निधन झाले. अमित एक महिन्यापूर्वी मुंबईतून गावी आला होता.अलीकडेच तो आजारी झाल्याने उपचारांसाठी त्याला ओरोस येथे हलविले होते. त्याच्या पश्यात आई, वडिल एक भाऊ असा परिवार असून ते मुंबईत राहतात.अमित यांच्या या दुःखद बातमीमुळे गावात शोककळा पसरली आहे

Read More

सावंतवाडीत मास्क न लावलेल्या युवकावर गुन्हा

तीन दुकानदारांवर गुन्हे:एपीआय स्वाती यादव यांच्या पथकाची कारवाई *💫सावंतवाडी दि.२२-:* कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने वेळेचे बंधन घातलेले असताना देखील, आज सावंतवाडी शहरात नियमांचे उल्लंघन करून सकाळी ११ नंतर देखील दुकाने सुरू ठेवणाऱ्या तीन दुकानांवर पोलिस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांनी कारवाई केली असून, शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या सहा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे….

Read More

*मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न लवकरच सुटून कामाला सुरुवात होईल

*पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती* *💫सावंतवाडी-:* सावंतवाडी तालुक्यात होणाऱ्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न लवकरच सुटणार असून, त्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सावंतवाडी तालुक्यासाठी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मंजूर केले होते. अशी माहिती पालकमंत्री…

Read More

मुख्यमंत्र्यांवर होत असलेली टिका दुर्दैवी

चार दिवसात मुख्यमंत्री मदत जाहीर करतील;पालकमंत्री उदय सामंत *💫सावंतवाडी दि.२२ प्रसन्न गोंदावळे-:* मुख्यमंत्र्यांवर होत असलेली टीका दुर्दैवी असून, चुकीची असल्याचे मत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. कोरोना सारख्या कठीण काळात मुख्यमंत्री करत असलेले काम पाहून विरोधक हतबल झाले असल्याची टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या…

Read More

राज्याच्या सहकार मंत्र्यांचे कणकवलीत आगमन

राष्ट्रवादीचे नेते अबिद नाईक यानी केले स्वागत;जिल्ह्यातील तौक्ते वादळाने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी *💫कणकवली दि.२२-:* तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार कॅबिनेट मंत्री बाळा पाटिल आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे आले असता, त्यांचे स्वागत राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यतील तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जनतेला…

Read More

कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कायदेशीर कारवाई

वेंगुर्ले पोलिसांची भाजपच्या प्रसन्ना देसाई यांना नोटीस *💫वेंगुर्ला दि.२२-:* मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दौ-याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याजोगा प्रकार घडून, कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचे कृत्य घडून आल्यास, तसेच जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मनाई आदेश लागू केलेल्या आदेशाचा भंग होऊन, कोरोना संक्रमणाचा प्रसार होईल असे कोणतेही कृत्य घडल्यास आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य…

Read More

यापुढे मराठा समाजाविरोधात बोलणाऱ्यांना वडेट्टीवार यांच्यासारखे उत्तर मिळणार

मराठा समाजाला घाबरून वडेट्टीवारांनी नियोजीत दौरा बदलला-:जिल्हा समन्वयक अँड सुहास सावंत कुडाळ-: मराठा समाजाच्यावतीने ओरोस रेस्ट हाऊस येथे महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करत निदर्शने केली. यावेळी अँड. सुहास सावंत यांनी यापुढे जर कोणी मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करेल तर त्यांना सिंधुदुर्गात अशाच प्रकारे मराठा समाजाच्या रोषाला…

Read More
You cannot copy content of this page