*⚡कणकवली दि.२३-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडल संचलित शेठ न म विद्यालयाचा एनसीसी च्या द्वितीय वर्षातील एनसीसी कॅडेट रोहन पुरुषोत्तम कांबळी याने कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर येथे गेले तीन दिवस चाललेल्या रायफल शूटिंग स्पर्धेत अव्वल कामगिरी करत पुढील स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.त्याच्या या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. एन सी सी कॅडेट असलेल्या रोहन कांबळी याला खारेपाटण हायस्कुल चे एन सी सी शिक्षक श्री कापसे सर यांचे मार्गदर्शन लाभले. रोहन याची पुढची स्पर्धा IGC Inter Directorate Shooting Championship असून ती 31 ऑगस्ट ला पुणे येथे होणार आहे।कोल्हापूर ग्रुप अंतर्गत येणाऱ्या 7 बटालियन मधून केवळ दोन ज्युनिअर कॅडेट्स ची निवड करण्यात आली असून त्यामध्ये त्याचा समावेश झाला आहे त्याच्या या यशात त्याचे आई व वडील या दोघांचा फार मोठा वाटा आहे “आपल्या वडिलांकडून लहानपणापासून शूटिंग चे धडे घेतलेला एन सी सी कॅडेट रोहन हा पुढील स्पर्धेत सुद्धा असेच यश संपादन करेल यात शंका नाही. आपल्या विद्यालयाच्या व एनसीसी विभागाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय आनंदाचा व अभिमानाचा आहे.” अशी प्रतिक्रिया खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी व्यक्त केली. खारेपाटण हायस्कुल चा विद्यार्थी व एन सी सी स्टुडंट रोहन पुरुषोत्तम कांबळी याचे खारेपाटण शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक यांच्या वतीने तसेच हायस्कुल चे मुख्यध्यापक आकिवटे व पर्यवेक्षक संजय सानप आणि एनसीसी विभागाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
खारेपाटण हायस्कुलच्या एन सी सी विद्यार्थ्यांची रायफल शुटिंग स्पर्धेत निवड
