आचरा येथे होणार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भव्यदिव्य स्वागत

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील आडवली मालडी मतदार संघातर्फे आचरा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती जि. प. बांधकाम सभापती तथा जन आर्शिवाद यात्रा नियोजन सदस्य महेंद्र चव्हाण व उपसभापती राजू परुळेकर यांनी आचरा येथील नियोजन सभेत दिली. केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांची जन आर्शिवाद यात्रा दि. २५, २६ व २७ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. दि. 26 रोजी १.३० वाजता मालवण तालुक्यातील आचरा येथे प्रथम आगमन होणार आहे. त्यामध्ये आडवली मालडी जि.प मतदार संघातुन सुमारे ३०० कार्यकर्ते, ५० मोटर सायकल रॅलीसह जावून स्वागत करणार आहे. या कार्यक्रमात माजी शिक्षण सभापती अनंत राऊत, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कुबल, बाळा लाड, गोपी लाड, गटनेते सुनील घाडीगांवकर विभागीय अध्यक्ष प्रशांत परब, शक्ती केंद्र प्रमुख निलेश बाईत, बबन परब, माजी उपसभापती अरुण मेस्त्री, नाथ मालंडकर, मागासर्वीय सेल अध्यक्ष राजेश तांबे व ज्येष्ठ पदाधिकारी बुथ अध्यक्ष सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रमुख कार्यकते यांच्या उपस्थीती राहणार आहे. तसेच सिंधुदुर्गची लोककल दशावतार यांच्या वतीने सुदधा स्वागत होणार आहे, अशी माहिती महेंद्र चव्हाण व राजू परुळेकर यांनी दिली.

You cannot copy content of this page