मालवण (प्रतिनिधी) मालवण मधील मोहन सायकल स्टोअर्सचे मालक व वायरी येथील रहिवासी मोहन विश्राम मांजरेकर (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी मेन रोड शाखा मालवणचे वरिष्ठ शाखाधिकारी नित्यानंद उर्फ नितीन मांजरेकर व क्रिकेटपटू शेखर मांजरेकर यांचे ते वडील होत. मोहन मांजरेकर यांच्यावर मोरेश्वर दांडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मालवण येथील मोहन सायकल स्टोअर्स चे मालक मोहन मांजरेकर यांचे निधन
