भाजप शिवसेनेत सरपंचपदासाठी रस्सीखेच होणार
*⚡कणकवली दि.२३-:* राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेत असलेल्या कणकवली शहरालगत असलेल्या कलमठ ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा आमने-सामने ठाकणार असून 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीत कलमठ सरपंचपदी कोण विराजमान होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान स्थितीत कलमठ ग्रामपंचायतीत भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने भाजपचा सरपंच होणार असल्याचे मानले जात असले तरी काही घडामोडी होतात का याकडे लक्ष लागले आहे कणकवली शहरालगतच असलेल्या कलमठ ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक दिनांक 24 ऑगस्ट रोजी असून सरपंच देविका गुरव यांनी चार महिन्यांपूर्वी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर तात्पुरता चार्ज शिवसेनेचे सदस्या उपसरपंच वैदेही गुडेकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता.आता निवडणूक होत असल्याने या सरपंच निवडणूकित भाजपकडे सदस्य संख्या 10 असली तरी शिवसेनेकडे 6 सदस्य आहेत व 1 अपक्ष आहे त्यामुळे अपक्षाचा पाठिंबा घेत फोडाफोडीचे राजकारण होते का? याबाबत उत्सुकता आहे. उपसरपंच वैदेही गुडेकर यांनी मागील काही महीने सरपंचपदाची धुरा सांभाळत गावाच्या विकासाला हातभार लावला होता.
