तुळस-होडावडा रस्त्याबाबत ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
*⚡वेंगुर्ला ता.०५-:* वेंगुर्ला-तुळसमार्गे सावंतवाडीकडे जाणा-या हमरस्त्यास तुळस ते होडावडा दरम्यान पडलेल्या खड्ड्यांची त्वरीत दुरुस्ती न केल्यास आम्ही ग्रामस्थ लोकशाही मार्गाने आंदोलन उभारणार असल्याचा इशारा उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्ला यांना लेखी स्वरुपात दिला आहे. या महामार्गावर तुळस ते होडावडा दरम्यान रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे खड्डे वाचवण्याच्या नादात अनेक छोटे-मोठे…
