*⚡सावंतवाडी ता.०५-:* मळगाव येथील श्री देव मायापूर्वचारी देवाचा वार्षिक जत्रोत्सव ८ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.यानिमित्त मंदिरात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी देवाला केळी, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री पालखी मिरवणुकीनंतर मळगाव येथील स्थानिक दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.
मळगाव येथील मायापूर्वचारी देवाचा ८ रोजी जत्रोत्सव
