नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा पर्यावरणपूरक गणेश मूर्तीद्वारे पर्यावरण संदेश
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण भागात आज शुक्रवारी ( दि. 18 सप्टेंबर ) पाच दिवसांच्या गणपतीचे जड अंत: करणात गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरा ही विसर्जनासाठी ठिकठिकाणी ग्रामीण भागात गर्दी झाली होती. वेंगुर्ला पोलीस ठाणे व वेंगुर्ला नगरपरिषद यांच्यामार्फत शहरात तसेच तालुक्यातील अन्य ठिकाणी ट्राफिकचे
योग्य नियोजन करण्यात आले होते. वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी पर्यावरणपूरक संदेश देत त्यांच्या घरी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्यात आली होती. उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी आज शुक्रवारी वेंगुर्ला भटवाडी येथे निवासस्थानी श्री गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी आ. किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत पर्यावरण च्या दृष्टीने गणेश विसर्जन साठी गणेश विसर्जन स्थळी निर्माल्य साठी निर्माल्य कलश व दोन ठिकाणी कृत्रिम तलाव ची व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे, पं. स. उपसभापती सचिन देसाई, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गावडे,
राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर, माजी आ. राजन तेली, सौ. वेदिका विशाल परब आदिनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले.आज शुक्रवारी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस विठ्ठल धुरी, वाहतूक पोलीस मनोज परुळेकर, पोलीस हवालदार प्रथमेश पालकर यांच्यासह अन्य पोलीस, होमगार्ड शहरात कार्यरत होते. वेंगुर्ला गाडीअड्डा येथे अनंत चतुर्दशी पर्यंत तसेच वेंगुर्ला पोलीस स्थानक येथे गणपती विराजमान राहणार आहे. पाच दिवस गणेशोत्सव कालावधीत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने गणेशभक्तांतून व भजनी मंडळातून समाधान व्यक्त करण्यात आले.
